जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी जाणुन घेतल्या नागरीकांच्या समस्या

सडक अर्जुनी, दी. 01 सटेंबर : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी गोरेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये भेटी देऊन नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. गोरेगाव तालुक्यातील बबई, म्हसगाव, चिल्हाटी, गिधाडी, बाम्हणी या गावांमध्ये भेटी दिल्या. भेटी प्रसंगी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात असलेल्या अडचणी व त्यावर उपाययोजना करुन लवकरात लवकर दुर करण्यात येतील.

या भेटी प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बबई व म्हसगाव येथे भेटी देऊन शाळेची पाहणी केली, शाळेतील मुलांसोबत हितगुज साधुन भौतिक व मुलभूत सुविधांची पाहणी केली. गोरगरीब कष्टकरी शेतकरी व शेतमजूरांची पाल्य शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना उत्तम व दर्जेदार शिक्षण देऊन सुज्ञ, तज्ञ, सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांनी करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत हौसीटोला येथील ग्रामसभेत उपस्थित राहून येथिल गावकऱ्यांच्या समस्या जाणल्या, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील समस्या जिल्हास्तर व राज्यस्तरावरून सोडविण्याची ग्वाही दिली. या भेटी प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रवक्ते सोमेश भाऊ रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते चोपलाल येडे, युवा नेते भास्कर मानापुरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बिसेन, प्रत्येक गावातील सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें