- रामदास मस्के यांची महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी निवड
- महिलांनी काढला अत्याचार विरोधात निषेध मोर्चा!
सडक अर्जुनी, दि. 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि खोडशिवणी ग्राम पंचायत येथील सरपंच गंगाधर जी परसुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 31 ऑगस्ट रोजी ग्राम पंचायत खोडशिवनी येथील ग्राम सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, प्रथम महिला ग्राम सभा संपन्न झाली, नंतर सर्वसाधारण ग्राम सभा पार पडली, विषय सुची वरील सर्व विषय मंजुर झाले, त्यावर कुणाला काही अडचणी असतील तर विचारणा करावी असे सांगीतले, त्यावर अनेक लोकांनी अडचणी विशद केल्या.
त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले, महिला ग्राम सभा आणि सर्व साधारण ग्राम सभा खेळीमेळीच्या वातावरनात पार पडली, मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष आणि युवक मित्र या सर्वांनी भाग घेवून एक आदर्श निर्माण केला, त्याबद्दल सर्व भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक मिञ या सर्वांचे ग्रामपंचायत खोडशिवणी च्या वतीने सरपंच गंगाधर परसुरामकर यांनी आभार व्यक्त केले, तसेच या वेळी पंचायत समिती सडक अर्जुनी चे सदस्य डॉ. रुकीराम वाढई, उपसरपंच, सचिव, ग्राम पंचायत सदस्य, उपस्थित होते.
दरम्यान आम सभेत रामदास फत्तुजी मस्के यांची सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी निवड झाली, तर बदलापुर येथे झालेल्या दोन चिमुकल्या बालीकांवरील अत्याचार आणि कलकत्ता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचाराच्या विरोधात खोडशिवणी गावातील महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी, ग्राम पंचायत येथील सदस्य महिला आणि गावातील महिलांनी एकत्र सहभाग घेत वरील घटनेचा निषेध वेक्त केला, खोडशिवनी गावाचा विकास करण्याचा, आणि गावातील नवीन पिळीला सु-संस्कृत करण्याचा ध्यास सरपंच गंगाधर परसुरामकर यांनी घेतला असून गावात नवं नवीन उक्रम राबविण्याचे काम सातत्याने सुरू असतात.