माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते इमारत बांधकामाचे भूमिपूजन

गोरेगाव, दि. 02 सप्टेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात माजी सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या प्रयत्नाने पिंडकेपार ग्राम पंचायत भवन बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. 20 लक्ष रुपयाचे मंजूर निधीतून गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे भवन बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्राम पंचायतच्या माध्यमातून गावाच्या विकासाची सुरवात कऱण्यात येते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध योजनेच्या निधीतून गावाचा सर्वांगीण विकास केल्या जात आहे. पिंडकेपार, कनारटोला या गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी, कटंगी जलाशयामुळे घरांना ओल येत असल्याची समस्या ही गंभीर असून याकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडविण्याच्या प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत. असे मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सर्वात शेवटचे गाव म्हणजे पिंडकेपार हे गाव आहे. या गावाचा विकास करण्याचा नेहमीच आपण प्रयत्न करीत आहोत, अनेक विकास कामे पिडकेपार गावाला आपल्या प्रयत्नातून दिलेले आहेत. गावकऱ्यांनी ज्या समस्या आमच्या पुढे मांडल्या त्या समस्या नक्कीच सोडवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन यांचे सुद्धा काम करण्यात येईल. असे मनोगत माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी व्यक्त केले.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत व माजी पंचायत समिती उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी आपण या गावासाठी काय केले व कोणती विकास कामे खेचून आणण्यात यशस्वी झालो याची सविस्तर माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने सरपंच योगिता ताई शहारे, उपसरपंच भरत घासले, सर्वश्री सदस्य निळकंठ बिसेन, चद्रकिशोर पटले, मंगलाताई पटले, रेखाताई रहांगडाले, कंचनाताई शहारे, रुपाताई लटये, कलाताई चौधरी, ग्रामसेवक के.एस. बैस, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्रनाथ मेश्राम, प्रा. सतीश शहारे, माजी सरपंच राजेंद्रसिंह राठोड, माजी उपसरपंच रविंद्र साखरे, माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश बिसेन, दिपक बोपचे, सुरेंद्र जोशी, सुशिलाताई टेभूर्निकर, सेवा सहकारी अध्यक्ष धनलाल बिसेन, जलमित्र खुमेंद्र बिसेन, भुमेश्वराताई पटले, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष एच. आर. पटले, सामजिक कार्यकर्ता लोकचंद बघेले, पुरणलाल बिसेन, राजाराम गाते, प्रा. कृष्णकुमार बिसेन, कुंजीलाल कटरे, सुकराम जोशी, शोभेलाल कटरे, देवानंद पटले, मंगरू बिसेन, देवेंद्र मेश्राम, श्रीराम भैरम, ग्राम पंचायत कर्मचारी राजकुमार साखरे, प्रशांत साखरे, राजेश चुलापर, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश बिसेन यांनी केले तर प्रस्तावना उपसरपंच भरत घासले यांनी मांडली व आभार ग्रामपंचायत सदस्य चंद्रकिशोर पटले यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें