- नाव सोनाबाई हाती कथलाचा वाडा अशी अवस्था झाल्याने मला सुद्धा मागे हटावं लागलं : शाहा
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 02 सप्टेंबर : सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व गोरेगाव तालुक्यात लोक प्रतिनिधीनी खालील काही प्रकल्प आणले असते तर तळा गळातील शेतकरी, शेतमजूर यांची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारली असती, असे मत एफ.आर.टी. शाहा यांनी वेक्त करीत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी अजून काय लीहले ते सांगण्या अगोदर आपण जाणले पाहिजे की हे शाह कोण आहेत, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ता आहेत. असे असून ते अर्जुनी मोरगाव येथील आमदार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांनी अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रातील आमदार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. विशेष म्हणजे शाहा हे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अत्यंत नजिकचे असून ते त्यांना आपले दैवत मानत होते, मात्र आता असे काय झाले की चक्क त्यांनी शोसाल मीडिया वरून आपली नाराजी वेक्त करीत या भागातील लोक प्रतिनिधींना म्हणजे आमदारांना टार्गेट करावे लागले आहे, हा चर्चेचा विषय बनला असून येत्या विधान सभा निवडणुकी मध्ये या गोष्टींचा मोठा फायदा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विरोधकांना होणार आहे.
शाहा पुढे लिहितात, मी कोणत्याच पक्षाचा नसून मला फक्त माझे मत मोकळे पणाने व्यक्त करायचे आहे. कित्येक वर्षा पासून रानभाज्या प्रदर्शन लावण्यात येतो. त्याचं उदघाटन लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी हे उपस्थित राहून करतात आणि प्रदर्शनात ज्या ज्या बचत गट महिलांनी, महिला शेतकऱ्यानी दोन तीन दिवस परिश्रम करून रान भाज्या, कंद, गोळा करून, काही महिला सकस आहार हे पकवान्न च्या रूपात सुद्धा आणतात. लोक प्रतिनिधी, अधिकारी प्रदर्शनीला येतात, उदघाटन करतात, भाषणं पण खूप देतात आणि गटाच्या महिलांना निव्वळ आशेचे किरण दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या रानभाज्याला जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, किंवा राज्य स्तरावर केव्हातरी या रानभाज्या उत्पादन करणाऱ्या गटातील किती महिलांचे सहभागी करून त्यांची आर्थिक प्रगती अश्या प्रदर्शनीतून झाली.
हे निव्वळ एक दोन दिवस प्रदर्शना पुरतंच सोपस्काराचा काम असतो बस झालं. आमच्या महिला प्रमाण पत्र घेऊन खुश होतात, काय करतील, माझ्या सारख्या काही कार्य कर्त्यांनी याबाबत काही करा असे सुचवले असता, त्यांचा राग केल्या जातो. कोणीही लोक प्रतिनिधी असो. बांधकाम हेच निव्वल विकासाचे काम नव्हे. आमचा जिल्हा हा शेतीत पिके घेऊन व्यवसाय करणारा जिल्हा आहे, बोड्यांनी, नद्यांनी, तलावानी नटलेला आहे. या जिल्ह्यात साखर कारखाना, जेव्हा भाजीपाल्याला भाव नसतो म्हणून उत्पादनांवर आधारित प्रक्रिया केंद्र उभारणे, बांबू, मत्स्य व्यवसाय करणाऱ्या साठी त्यांना प्रोत्साहित करून तालुका स्तरावर एका ठिकाणी खरेदी केंद्र उभारून बाहेर निर्यात करण्याची व्यवस्था करून देणे अश्या कामातून सर्वांगीन विकास साधल्या जातो.
मत्स्य, बांबू, व्यवसाय चे केंद्र उभारणीसाठी नितीन भिमटे सोबत मी स्वतः परिश्रम घेऊन हजारो अर्ज प्रपत्रात माहिती भरून लोक प्रतिनिधी यांना देण्यात आली, पण त्यावर कोणीच प्रतिनिधीनिने लक्ष दिलं नाही. आणि आता ते हे आणू ते आणू सांगतात. इथेनाल प्रकल्प तयार करण्यासाठी प्रभू डोंगरवार यांनी खूप प्रयत्न केले. सौंदड येथे फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा रजिस्टर करण्यात आली पण लोक प्रतिनिधिनी साथ न दिल्याने एक चांगला उद्देश असलेल्या प्रकल्पाला शेतकरी वर्ग मुकला आहे.
आज तो कागदावरच आहे. इथेनाल प्रकल्प सुरु झाला असता तर आज धान उत्पादक शेतकरी सुखावला असता. माझं बोलणं कोणाला उद्देशून नसून, शेतकऱ्यांची कामे व्हावी या करिता मी राजकारणात आलो, खपलो, खूप मेहनत केली पण नाव सोनाबाई हाती कथलाचा वाडा अशी अवस्था झाल्याने मला सुद्धा मागे हटावं लागलं कारण मी एक अल्प सख्याॅंक असल्याने तसेच माझ्या घरी राजकीय वारसा नसल्याने, आणि मला चोपड्या गोष्टी येत नसल्याने माझा नाईलाज झाला आहे. माझा शेतकरी समजदार आहे. शेतकरी हा कोणाचा मोहताज नाही, हे राजकारण्यांनी लक्षात ठेवावं धन्यवाद, आपला हितचिंतक एफ.आर.टी. शहा असे मेसेज त्यांनी सोशल मीडियावर टाकत आपल्या आणि सामान्य जनतेच्या भावना लक्ष्यात घेता खंत वेक्त केली शाहा हे कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून कामाला होते शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी जवळून पहिल्या आहेत. शाहा ची नाराजी कश्यामुळे बाहेर आली हे समोर पाहण्यासारखे असेल.