नागरिकांनी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा : माजी मंत्री राजकुमार बडोले

अर्जुनी मोर. दी. 19 जुलै : महाराष्ट्रातील भाविकभक्तांना तिर्थदर्शनाचा लाभ मिळावा म्हणुन राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना आणली असुन महाराष्ट्रातील भाविकभक्तांनी  ( नागरिकांनी ) या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री ईंजी. राजकुमार बडोले यांनी केले आहे.

मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेत प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतका प्रवास खर्च मिळणार आहे. यामधे महाराष्ट्रासह देशातील काही प्रमुख तिर्थस्थळांचा समावेश राहणार आहे. या योजनेत भाविकभक्त लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यापेक्षा जास्त वय वर्ष असणा-या जेष्ठ नागरीकांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेअंतर्गत 30 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येणार असुन यामधे प्रवास खर्च, जेवन खर्च आणी राहण्याच्या खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मंत्री ईंजी. राजकुमार बडोले यांनी केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें