खा. डॉ. प्रशांत पडोळे इंजेक्शन च्या जागी हातात पेंडी घेत उतरले शेतात, मात्र कंपाउंडर होता धुऱ्यावर उभा

गोंदिया, दि. 19 जुलै : खा. डॉ प्रशांत पडोळे यांनी तीन महिन्या आधी हातातील इंजेक्शन सोडत कॉग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेत राजकारणात उतरले तर आता खा. प्रशांत पडोळे हे आपल्या मतदार संघात फिरत असताना नव नवीन स्टॅंस्ट करताना दिसून येत आहेत दोन दिवसा आधी खा. महोदयांनी एस. टी. बस ने प्रवास केला तर आज दी. 17 जुलै रोजी चक्क गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या घाणोरी गावातील महेश कटरे यांच्या शेतात चक्क भात पिकाचा परा लावायला शेतात उतरले जणू काही कटरे यांचा शेत लावून सोडतात कि काय असा प्रशन कटरे यांना पडला होता.

तर खा मोहद्यान सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील शेतात परे लावण्याचा मोह आवरला नाही मग काय कार्यकर्ते देखील फोटो सेशन कार्याला शेतात उतरले मात्र अवघ्या काही मिनटातच शेतातून खा. आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाहेर निघाले त्यामुळे कटरे यांची गोची झाली आणि त्यांना आपल्या मजुरांच्या मदतीने शेतातली परे लावावे लागले.

विशेष बाबा म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे निवडून येताच कामाला लागले आहे. मग तो एस. टी. बस चा प्रवास असो कि शेतात परे लावण्याचा किंवा भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरील गड्डे बुजविण्या काम असो त्यामुळे येत्या काही दिवसात कोणेते नवीन कामे करतात हे पाहण्या सारखे असेल. खा. डॉ. प्रशांत पडोळे हातात पेंडी घेत भात पिकाची रोवणी करण्यासाठी शेतात उतरले मात्र त्यांचा कंपाउंडर धुऱ्यावर उभा होता अशी चर्चा रंगू लागली आहे. आता हा कंपाऊंड कोण आहे. त्याचा शोध जनतेने लावावं.

Leave a Comment

और पढ़ें