कोहळी समाज विकास मंडळ नागपूर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

अर्जुनी मोर, दि. 19 जुलै : कोहळी समाज विकास मंडळ नागपूर तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशन्न सभागृह अर्जुनी मोर. येथे करण्यात आला. दिनांक 17 जुलै 2024 रोजी अर्जुनी मोरगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. परशुराम  खुणे यांच्या हस्ते दहावी व बारावी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त १०० विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी मंडळातर्फे करण्यात येत असलेले विविध उपक्रम व भविष्यातील योजना याबद्दल आपल्या प्रास्ताविकातून प्रकाश टाकला.

कोहळी समाज भवन नागपूर येथील भव्य इमारत बांधकामाला १ कोटी रक्कम राज्य शासनाकडून मंजूर झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दुपारच्या सत्रात पार पडलेल्या आमसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले.

या वेळी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आमदार गंगाधर परशुरामकर, डॉ. हरिश्चंद्रजी बोरकर, ज्ञानदेव परशुरामकर, नामदेव कापगते, चित्तरंजन सोनवाने, हिरामण लांजे, डॉ. तेजराम बुद्धे, श्रीमती अंजनाबाई खुणे, उमाशंकर पर्वते, डॉ. दशरथ कापगते, सुखदेव भाकरे, तीर्थराज कापगते, नरहरीजी खुणे, शालिकराम बोरकर, सदानंद बोरकर, दादा गहाणे , श्याम हटवादे, ,रामचंद्र कापगते, नाना बोरकर , श्रीकांत बुद्धे , होमराजभाऊ कापगते, वामनजी खुणे, यशवंत लांजे, नाना नाकाडे व समाजातील गणमान्य प्रतिष्ठित मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मंडळातर्फे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा सत्कार करण्यात आला सोबतच गोंदिया जिल्हा कोहळी कर्मचारी संघटन तर्फे नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे व मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी समाज बांधवांनी एकोप्याने काम करून समाजाचा विकास साधण्याचे आवाहन उपस्थित समाज बांधवांना केले.

यावेळी कोहळी समाज विकास मंडळ कार्यकारणी चे पदाधिकारी प्रकाश बाळ, अमोल मुंगमोडे , माणिकराव लोथे, हितेश ठिकरे, राजेश कापगते, प्रकाश गहाणे, रमेश बोरकर, ओमप्रकाश संग्रामे, छाया कापगते, नयना बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोंदिया जिल्हा कोहळी समाज कर्मचारी संघटनचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, दिलीप लोदी, आशिष कापगते, रमेश संग्रामे, कांतीकुमार बोरकर, दिलीप नाकाडे, चोपराम गोबाडे, मंगेश पर्वते, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी लोथे, वीणा डोंगरवार व ओमप्रकाश संग्रामे ह्यांनी केले तर मंडळाचे सचिव माणिक लोथे ह्यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें