कत्तल खाण्यात जाणाऱ्या 34 जनावरांची पोलिसांनी केली सुटका!


सडक अर्जुनी, दी. 10 सप्टेंबर : उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर देवरी व त्यांच्या पथकाने दिलेल्या माहिती वरून एक टाटा आइसर ट्रक मध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांना कोंबून कोहमारा नवेगावबांध मार्गे नागपूरकडे नेणार आहेत. त्या आधारे पो. स्टे. नवेगावबांध येथील पोलिस नवेगावबांध पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी करीत असताना दि. 09 सप्टेंबर रोजी च्या पहाटे 04. 45 वा. च्या सुमारास कोहामारा कडून नवेगावबांध दिशेने जाणारा एक टाटा ऑइसर क्रमांक सी. जी. 08 ए.यु. 0956 हा ट्रक येताना दिसल्याने पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला.

ट्रक चालकाने ट्रक थाबविले असता ट्रकची पाहाणी केली तर ट्रक च्या डाल्यामध्ये एकूण 34 गोवंश जनावरे मिळून आली. सदरची 34 गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या पाण्या विना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी सदरचा ट्रक व त्यातील 34 गोवंश जनावरे असा एकूण 15 लक्ष 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

34 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता गौशाळेत दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी टाटा आईसर ट्रक चालक व क्लिनर यांचे विरुध्द पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अप. क्र. 78/2023 भारतीय दंड विधान कलम 279, सह कलम 11 (1),(ड)(इ)(फ) प्रा. छ. प्रति. अधि. सह कलम 5 ए, बी, 9 प्रा. स. अधि. 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन नवेगावबांध येथील पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नवेगावबांध चे ठाणेदार स पो. नि. संजय पांढरे पो. उप. नि. मंगेश वानखडे, पोहवा सोनटके, दहिफळे, पोलीस नाईक जितेंद्र कटरे, पोशि सोनु नागपुरे, चा. पो. हवा. शाकीर शेख यांनी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें