गोंदिया, दी. 01 ऑगस्ट : जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे सेवा सेवानिवृत्ती संबंधाने पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील Conference Hall gondia येथे त्यांचे निरोप व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन 31 जुलै रोजी करण्यात आले.
या अनुषंगाने आज रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दलातील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी-अंमलदार – पोलीस उप- निरीक्षक धनराज बाजीराव कुळमेथे, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक, अरुण चिंतामन मदारकर, अरुण नारायण ब्राम्हणकर, खुशाल रघुनाथ भस्मे, तसेच सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक धनलाल हगरुजी राहांगडाले, पोलीस हवालदार भागवत पतिराम मेश्राम, पोलीस शिपाई गोविंदसिंग भागवतसिंग पंडेले, यांचा पोलीस अधीक्षक गोदिया निखील पिंगळे , यांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले.
सदरचे सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया निखील पिंगळे, प्रभारी पोलीस उप अधिक्षक (गृह). श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी, अमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, तथा अति कार्य. पोलीस उप अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, यानी केले. तर सदर चे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, पोहवा राजु डोंगरे, राजू वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.