सौन्दड, दि. ०४ मे २०२३ : फेब्रुवारी २०२३ ला शिष्यवृत्ती ची परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचे निकाल नुकताच जाहीर झाले. त्यामध्ये पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे चार विधार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये हिमांशी सत्यजित राऊत, आर्यन नरेश गहाणे, नाविन्य मंगेश मेश्राम तसेच खुशी निकेश कापगते यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य गुण प्राप्त केलेले असून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
त्याचे सत्कार शाळेत बोलावून संस्थापक संतोष राऊत यांचे हस्ते करण्यात आले. सर्व शिक्षकानी त्याचे कौतुक केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील तसेच शाळेचे संस्थापक संतोष राऊत, मुख्याध्यापिका कुमारी राजश्री बडोले, आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 87