आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते ३ कोटी १७ लाख रुपयाच्या विकासकामांचे शुभारंभ


सडक अर्जुनी, दिनांक : २१ मार्च २०२३ : अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शनिवारी गोंगले येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गोंगले या गावात आमदार स्थानिक विकास निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा व एकलव्य पुतळ्याजवळ सौंदर्यकरण, ५ लक्ष, काल्हा देव मंदिराजवळ सभा गृहाचे लोकार्पण १० लक्ष, ग्रामस्थांच्या मागणीवरून बांधलेल्या अंगणवाडी खोलीचा लोकार्पण १० लक्ष , प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत गोंगले ते बक्कीटोला रस्ता वर पुल १ कोटी ४९ लक्ष रू लोकार्पण तसेच गोंगेले/पैकनटोली, बक्कीटोला, भोयरटोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत ०१ कोटी ४३ लक्ष रुपयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन केला. भूमिपूजन कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ग्रामपंचायत गोंगले यांचे कौतुक केले. गावात विविध बांधकामे केल्यास गावकऱ्यांची व परिसरातील नागरिकांना सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सडक अर्जुनी तालुक्यात अनेक भागांचा अद्यापही अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे अशा दुर्लक्षित भागातील विकासावर आम्ही भर दिला या भागांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन आमदार चंद्रिकापुरे यांनी दिले.

अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रस्तावित आहेत. या कामांनाही लवकरच भूमिपूजना नंतर सुरुवात होणार आहे. शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. या आधीही आम्ही पांढरी जि. प क्षेत्रातील अनेक जोड रस्त्यांचे काम पूर्ण केले आहे. आणि काही काम प्रस्तावित आहे. तीही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

या प्रंसगी जिल्हा परिषद सदस्या सुधाताई रहांगडाले, सरपंच शामकला करचाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महा सचिव डी. यू. रहांगडाले, माजी सरपंच विश्वनाथ रहांगडाले, मोरेश्वर राऊत, भोजराज रहांगडाले, तुळशीराम बिसेन, माणिकचंद रहांगडाले, संगीता रहांगडाले, मदन येळे, आशा कृपान, मनीषा कृपाले, नरेश केवट, बालू गजबे, उषाताई रहांगडाले, साहिल बीसेन, प्रशांत येळे, शैशराम पटले, प्रमिला वैद्य, विमला भेलावे, तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें