गोंदिया, दिनांक : २१ मार्च २०२३ : पोलीस ठाणे रावण वाडी हद्दीत दिनांक दि. १७/०३/२३ रोजी चे २०:३५ वाजता चे सुमारास मौजा -निलज येथे फिर्यादी संदिप खेमलाल मस्के वय २५ रा. निलागोंदी, रतनारा, ता. गोंदीया, हे टिप्पर क्र. एम एच. बी. जी. ६५९७ ने गोंदियाकडे येत असतांना टिप्पर समोर एका चॉकलेटी रंगाचे चारचाकी वाहना ने ५ ते ६ अनोळखी इसमांनी येवून जबरीने यातील फिर्यादी यांचे ताब्यातील टिप्पर क्र एम. एच. बी. जी ६५९७ आणि रोख रक्कम ४०,०००/- रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याने तक्रारी वरून पोलीस ठाणे – रावणवाडी येथे अप क्र.६३/२०२३ कलम ३९५ भादवि अन्वये दाखल करण्यात आले होते.
यात आरोपी नामे 1) हरीचंन्द्र देवीदास पटले रा. डोंगरला, ता. तुमसर जि. भंडारा यास व त्याचे साथीदार, 2) नितीन मंगलदास पटले वय 24 वर्ष, 3) दुर्योधन चैनलाल पटेल वय 27 वर्षे रा. डोंगरला, ता.तुमसर,भंडारा, 4)अब्दुल रशिद रज्जाक कुरेशी वय 43 वर्ष रा. येरली ता. तुमसर, जि. भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत इसम क्र. १ यास गून्ह्या संबंधाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सुरुवातीस उडवा उडवीचे उत्तरे देवून सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संशयीत ईसंम क्र. 2 ते 4 असे सर्वांनी मिळून केले असल्याबाबतची कबुली दिली.
वरील नमूद संशयीतांचे ताब्यातून जबरीने चोरलेला टिप्पर किमती अंदाजे 30 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा चार चाकी वाहन किमती अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण 35 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद चारही संशयीतांना गुन्ह्यांतील जप्त मुद्दे मालासह पुढील तपास संबंधाने पो. ठाणे रावण वाडी यांचे स्वाधिन २० मार्च रोजी करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई व तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.