चोरी झालेला 2 लक्ष ९ हजार रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीला केला परत


गोंदिया, दिनांक : २१ मार्च २०२३ : फिर्यादी सुमित अशोक उईके, रा. आर. पी. एफ. कॉर्टर, पोस्ट ऑफीस जवळ, गोंदिया, हे दिनांक ०५/१० /२०२२ ते दिनांक ०७/१० / २०२२ पर्यंत बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्याचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन लोखंडी कपाटातील १) सोन्याचा दागिने नेकलेस, टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र,लॉकेट, आंगठी, चैन, कनोती व चांदीचे पैंजण असा एकुण किमती २,० ९०००/- रुपयाचा मुद्देमाल सोन्या – चांदीचे दागिने चोरी गेल्याने रिपोर्ट वरून पो. ठाणे गोंदिया येथे अप. क्रं. ६३९/ २०२२, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद विण्यात आलेला होता.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिलेल्या निर्देश, सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया शहर चे पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) सोनु गोपाल चव्हाण वय ३८ वर्ष, रा. गौशाला वार्ड, गोंदिया, २) राजेश भरत गायक वाड वय ४० वर्ष,रा. सेंदुरवाफा, जि. भंडारा, ३) मनिष ऊर्फ बुच्चीमनु कुलदिप वय २३ वर्ष, रा. दसखोली, गोंदिया

यांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन अटक केली होती. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान नमूद तिन्ही आरोपी यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे दागिणे १) नेकलेस, टॉप्स लॉकेट, सोन्याची आंगठी ५) सोन्याची २२ नग मनी लहान व चांदीचे पैजन ४ नग, एक सोन्याचे लॉकेट , एक सोन्याची चैन ,पेन्डल, सोन्याची कनोती असा एकुण २,०९,०००/- रुपयाचा मुद्देमाल दागिने गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आले होते. दिनांक १७ मार्च २०२३ रोजी मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी सुमित अशोक उईके यांना पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे ( परत ) देण्यात आलेले आहेत. वरील घरफोडीच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपी हे दिनांक- १८/११/२०२२ पासून मा. न्यायालयाचे कस्टडी मध्ये आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें