आरोपीस 5 वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा.


गोंदिया, दिनांक : २१ मार्च २०२३ : गौतम नगर गोंदिया येथील रहिवासी फिर्यादी- मीरा बाई बेवा. धिरज रणगीरे यांचे घराचे मागील सीमेंटची खिडकी तोडुन कोणीतरी अज्ञात चोरांनी गोदरेज आलमारीचे लॉकर मधील नगदी ३००००/- व सोन्या चांदीचे दागीने किंमती – १२९१० /-रू. असा एकुण ४२९१०/- चा माल चोरुन नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारी वरुन गोंदिया शहर पो. ठाणे येथे अप. क्रमांक – ४५०/२०२० कलम ४५७,३८० भादवि. अन्वये गुन्हा नोंद करून तपास करण्यात आले. तपास दरम्यान घरफोडी करणारा गुन्हेगार आरोपी नामे – अमर सुरेन्द्र मेश्राम वय २४ वर्ष, रा. गौतम नगर गोंदिया यास गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचे तपासा अंती आरोपी विरुध्द मा. न्याया लयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. माननिय मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया, येथे फौजदारी खटला क्र.- १९८ /२०२० प्रमाणे चाल विण्यात आला.

सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी- अमर सुरेन्द्र मेश्राम, वय २४ वर्ष, रा. गौतम नगर गोंदिया, याचेविरूध्द मा. न्यायालयात चाललेल्या युक्तिवाद व साक्ष पुराव्यावरून, दोषसिध्द, झाल्याने आज दिनांक १६/०३/ २०२३ रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. अभिजीत कुलकर्णी , न्यायालय गोंदिया यांनी आरोपी यास ५ वर्षे सश्रम कारावास व २०००/- रू. द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. घरफोडी करणारा आरोपी नामे अमर सुरेन्द्र मेश्राम, वय २४ वर्ष, रा. गौतम नगर गोंदिया याचे विरुध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे एक गुन्हा नोंद आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें