गोंदिया, दिनांक : २१ मार्च २०२३ : शहरात घरफोडी करणारे आरोपी नामे १) सागर यशवंत लिल्हारे, वय २८ वर्ष,रा. पारडीबांध, भानपुर गोंदिया, २) नितेश देवराज आंबेडारे, वय २४ वर्ष, रा. पारडीबांध, भानपुर गोंदिया यानी दि. २१/०८/२०१७ ते २२/०८/२०१७ चे रात्र दरम्यान फिर्यादी अमीत रमेशलाल चंदानी रा.सिंधी कॉलोनी, झुलेलाल वार्ड गोंदिया, यांचे भादुले कॉम्पलेक्स, वार्ड क्र. ८, प्रभु रोड गोंदिया येथील मोबाईल दुकानाचे शटरचा टाळा तोडून एकुण १८ नग मोबाईल किंमती ७७०८०/- रुपयाचे व रोख रक्कम असा एकुण ८४०८०/- रु. चा माल चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरुन गोंदिया शहर पोलीस ठाणे गोंदिया येथे अपराध क्रमांक ४८०/२०१७ कलम ४५७, ३८० भादवि. अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद आरोपीतांविरुध्द तपासाअंती दोषारोपपत्र मा . न्यायालयात दाखल करण्यात आले. मुख्य न्यायदंडा धिकारी, न्यायालय गोंदिया, येथे फौजदारी खटला क्रमांक १८/ २०१८ प्रमाणे चालविण्यात आला.
सदर खटल्याचे सुनावणीत आरोपी नामे- १) सागर यशवंत लिल्हारे, वय २८ वर्ष, २)नितेश देवराज आंबेडारे, वय २४ वर्ष,
यांचे विरूद्ध भक्कम साक्षपुराव्यावरून दोष सिध्द झाल्याने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकणी, न्यायालय गोंदिया, यांनी दिनांक २०/०३/२३ नमुद दोन्ही आरोपी यांना प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास व २०००/- रू. द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे.