सडक अर्जुनी, दिनांक : १२ मार्च : स्थानिक जी.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नविन इमारत भूमीपूजनाचा कार्यक्रम आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या अध्यक्षतेखाली दि ११ मार्च रोजी करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी सांगितले की शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे ५६३ विद्यार्थी जी. प. हायस्कूल येथे शिक्षण घेत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत उत्तम प्रकारचे शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानासाठी शाळेतील शिक्षकांबरोबरच भौतिक सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सत्र २०२२-२३ मध्ये नवीन पाच वर्ग खोली बांधकाम भूमीपूजनाच्या प्रसंगी आमदार बोलत होते. या प्रसंगी इंजी. यशवंत गणवीर उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती जी. प. गोंदिया भूमीपूजक म्हणून, जी. प. सदस्य तथा अध्यक्ष शाळा समिती चंद्रकलाबाई मनोहर डोंगरवार, उपाध्यक्ष अल्लाउद्दीन राजानी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कोरे, उपाध्यक्ष ममिता लांजेवार, गटशिक्षणाधिकारी एस आर बागडे, मुख्याध्यापक अनिल मेश्राम, पत्रकार आर व्ही मेश्राम, बिरला गणवीर, प्रशांत डोंगरे, कंत्राटदार मुन्ना देशपांडे शाळेतील शिक्षक डी पी डोंगरवार, आर ए बावनकर, सी एम भिवगडे, व्ही पी आगाशे, एन आर गिरेपुंजे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व प्रथम आमदार मनोहर चंद्रिकापूरे आणि इंजी यशवंत गणवीर उपाध्यक्ष जी प गोंदिया व उपस्थित मान्यवरांनी भूमीपूजन केले. आमदार मनोहर चंद्रिकापूरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती इंजी यशवंत गणवीर यांनी कुदळ मारुन भूमीपूजनाचा सुभारंभ केला.
पुढे बोलताना आमदार यांनी सांगितले की शिक्षकांनी मेहनत घेऊन सुसंस्कृत आदर्श विद्यार्थी घडविण्याचे महत्वाचे काम करावे असे आवाहन केले.
नवीन शैक्षणिक वास्तू लवकरच निर्णय होऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक उत्थानासाठी महत्वाचा घटक आहे. असे मत व्यक्त केले. या प्रसंगी इंजी यशवंत गणवीर उपाध्यक्ष यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी या हेतूने नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू करुन इमारत पुर्णत्वास येईल असे सांगितले. शिक्षक यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच भारतीय संविधान विद्यार्थ्यांना अवगत करुन द्यावे त्यामुळे भारतीय लोकशाही मुल्ये वृद्धिंगत होतील असा विश्वास व्यक्त केला. संचालन शिक्षक डी पी डोंगरवार यांनी केले. मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.
यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.