शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रुप च्या निष्ठावंत शिव सैनीकांनी साजरी केली शिव जयंती.


सडक अर्जुनी, दिनांक : १२ मार्च :  छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान गोपाळटोली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना कार्यकर्ते तालुका सडक अर्जुनी तथा शिवकालीन शेतकरी संघटना च्या वतीने तिथीनुसार शिव जयंती मोहोत्सव तथा नवनिर्वाचित गोंदिया जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे एकमेव सरपंच, उपसरपंच, सदस्य , ग्राम पंचायत गोपळटोली यांच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात हजारों च्या संख्येत शिवप्रेमी आणि शिव सैनिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पंकज यादव शिवसेना जिल्हा प्रमुख गोंदिया, राजू भाऊ पटले माजी शिवसेना जिल्हा संघटक गोंदिया, महेंद्र वंजारी माजी सभापती बांधकाम विभाग तथा नगर सेवक नगर पंचायत स/अर्जुनी, माजी बांधकाम सभापती युवराज गौतम शिवसेना उप तालुका प्रमुख, विशाल उजवने शिवसेना विभाग प्रमुख सौंदड, घनश्याम कापगते शिवसेना विभाग प्रमुख शेंडा, योगेश मालदे उपशाखा प्रमुख सौंदड, रवी सावरकर, कू. भुमेश्वरी चौडाये शिवसैनिक पांढरी, योगेश्वरी पटले मुख्याध्यापक नवज्योती कन्या विद्यालय स/अर्जुनी.

यावेळी ज्यांचे सत्कार करण्यात आले असे सत्कार मूर्ति सरपंच दिनेश्वरी गौतम, उप सरपंच हंसराज राऊत, ग्राम पंचायत सदस्य हरीश टेंभुर्ने , प्रेमकुमार पटले, ओमकला राऊत, ओमेश्वरी पारधी, मनीषा साखरे, पदमा बडोले, रूपलता वालदे अंगणवाडी सेविका, ओमकार मेंढे माजी सरपंच कोसबी, पृथ्वीराज पारधी माजी उप सरपंच, हेमराज राऊत माजी सरपंच गोपालटोली, पांडुरंग चौधरी , शामलाल पाटील ज्येष्ठ नागरिक, लालदास निकुडे सावंगी, भूमेश्वरी पारधी ज्येष्ठ नागरिक, सह अन्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें