सडक अर्जुनी, दिनांक : १२ मार्च २०२३ : गोंदिया जिल्ह्याच्या वन परीक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सौन्दड वन क्षेत्र सहाय्यक परिसरातील शेत शिवारात एका वन्य प्राण्याची शिकार करून त्याची मटन विक्री केल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना ११ मार्च रोजी मिळाली. त्या अनुसंघाने वन विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता. शोध पथक तय्यार करून घटनेचा तपास चक्र फिरविला दरम्यान आरोपी नामे : अश्विन अंबादास बनसोडे मु. घाटबोरी/कोहळी यांना ताब्यात घेऊन विचार पूस केली असता त्यांनी आपल्या शेतात जनावरे शेतीची नास धूस करीत अश्ल्याने जनावरे शेतात येऊ नये म्हणून.
शेतीच्या बांधावर विधूत तार पसरवून त्यात विधूत पुरवठा चालू करून ठेवला होता. दरम्यान १० मार्च रोजीच्या रात्रीला एका रानटी डुकराची विधूत झटक्याने जागीच मृतू झाले. दरम्यान शेतकरी यांनी संगणमत करून मृतू झालेल्या जनावराच्या अवयवाची म्हणजेच ( मटनाची ) विक्री केली. तपासा दरम्यान आरोपी नामे पुरुषोत्तम फकीरा कांबळे यांच्या राहते घरी जर्मन गंजी मध्ये शिजलेल्या अवस्थेत वन्य प्राणी म्हणजेच रानटी डुकराचे मास मिळून आले. यात अन्य दोन आरोपींचा समावेश अश्ल्याचे समोर आले. मंगेश मेश्राम, मुनेस्वर वंजारी तिन्ही राहणार पंचवटी असे आहेत. एकूण चार आरोपींना वन विभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले.
त्यांच्यावर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ५१, अन्वय गुन्हा क्र. ०४११०/ १०२७२८/०१/२०२३ दाखल करण्यात आला. आज १२ मार्च रोजी चारही आरोपींना मा. न्यायालय सडक अर्जुनी येथे हजार केले असता. चारही आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. एड. दीपक बनसोड सह तिघांनी आरोपींची बाजु मांडली होती. ही कार्यवाई वन परीक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव, युराज राठोड क्षेत्र सहाय्यक, युराज ठवकर क्षेत्र सहाय्यक, गजानन सय्याम क्षेत्र सहाय्यक, नरेंद्र वाढई क्षेत्र सहाय्यक, नेपाल पंचभाई वन रक्षक, तरुण बेलकर वन रक्षक, बिंदू राहाण्गडाले वन रक्षक सह अन्य यांच्या पथकाने ही कार्यवाई केली आहे.