राष्ट्रवादी पक्षाच्या गोंदिया जिल्हा अध्यक्षांच्या वाहनाचा अपघात


सडक अर्जुनी, दिनांक : ०८ फेब्रुवारी २०२३ : गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडशिवणी येथील नवनिर्वाचित सरपंच गंगाधर परसुरामकर यांच्या वाहनाचे राज्य महामार्ग क्रमांक : ७५३ वर ०७ फेब्रुवारीला च्या रात्री ९ : ३० वाजता मुरदोली जंगल परिसरात अपघात झाला. त्यांच्या बरोबर माजी जि. प. सदस्य किशोर तरोने व त्यांचा वाहन चालक होता. ते गोंदिया येथे एक लग्न समारभ आटपून घरी येत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

परसुरामकर सह तीन लोक मारुती कंपनीच्या स्वीप कार ने गावाकडे येत होते. दरम्यान मुर्दोली जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला कोंबड्यांची गाडी बंद अवस्थेत उभी होती. त्या ट्रकला कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर लावलेले नव्हते. रात्रीची वेळ अश्ल्याने अचानक उभा असलेला ट्रक वाहन चालकाला दिसला नाही. परिणामी अपघात घडला.

वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. नेहमी समोर बसणारे परसुरामकर आज मात्र मित्राबरोबर मागे बसले होते. वाहन आदळल्यामुळे परसुरामकर यांच्या डोक्याला चस्म्याची फ्रेम लागल्याने किरकोळ दुखापत झाली. परसुरामकर, तरोने आणि त्यांचे वाहन चालक हे दोघेही सुखरूप बचावले आहेत.


 

Leave a Comment