दोघांच्या सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नाही : सर्वोच्च न्यायालय


मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२३ : दोघांच्या सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला आहे. दोघांच्या सहमीतीने ठेवलले संबंधत बलात्कार नाही, असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने एका व्यक्तीची निर्दोष सुटका केली आहे. संबंधित व्यक्तीवर लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी दिल्ली सत्र न्यायालयाने आणि दिल्ली उच्च न्यायलयाने आरोपीला दोषी ठरवले होते.

दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदल ला उच्च न्यायालयाने सात वर्षाच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने अहमदची बलात्काराच्या आरोपातून सुटका केली. सहमतीने ठेवलेले शारिरीक संबंध बलात्कार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अनेक कारणांमुळे शाररिक संबंध बिघडल्यामुळे महिलांकडून बलात्काराचा आरोप केला आहे.

अहमद शाररिक संबंध ठेवण्यासाठी अहमदने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दिले होते, असा सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, अशी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली. तसेच संबंधित महिलेने अहमदकडे काही पैशांची मागणी केली होती. अहमदने नकार दिल्यानंतर महिलेने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला, असाही सवोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.


 

Leave a Comment