क्रांतीसुर्य जननायक विर बिरसा मुंडा आदिवासींचा अभिमान – डॉ.सुगत चंद्रिकापुरे


अर्जुनी मोरगाव, दिनांक : २३ जानेवारी २०२३ : आदिवासी समाजाचे वीर योद्धे क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दी.२२ रोजी सिरोली येथे मोठ्या थाटामाटात डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचा हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बी. एस. सयाम, लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष अर्जुनी/मोर., किशोर कुंभरे, गोवर्धन कुंभरे, चीचामें, खुशाल कोडापे, सुरेशकुमार पंधरे सहभागी झाले होते. अनावरणापूर्वी सिरोली गावातून मोठी मिरवणूक काढण्यात आली, त्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीत शूर योद्धा बिरसा मुंडा यांचा जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीने संपूर्ण गावात फेरफटका मारला त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरणानंतर आदिवासी संस्कृतीनुसार क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रुखमाबाई कोवे, शालुबाई संजय कोवे व रामजी सडमाके यांच्या मदतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा गावात बसवण्यात आला.

यावेळी डॉ. सुगत चंद्रिकापुरे म्हणाले की, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा हे भूमी आणि आदिवासींचे लोकनायक आहेत. ज्यांनी आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या लोककथा आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहेत आणि तरुण पिढीसाठी त्या आदर्श आहेत. आदिवासी समाजासाठी त्यांनी इंग्रजांकडून लोखंड घेतले आणि तुरुंगातही गेले पण त्यांचे इरादे सदैव ठाम होते. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजासाठीच नाही. तर संपूर्ण युवा पिढीसाठी आदर्श आहेत कारण त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंडाचा बिगुल धाडसाने बुलंद केला. आदिवासींच्या न्याया हक्का साठी इंग्रजांशी धनुष्यबाणाने लढा दिल्याने ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले आणि आदिवासींचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मधुकर ताराम, विवेक पुराम, गोपीचंद पुराम, सचिन ताळाम, श्रीराम पंधरे, सिताराम उईके, रामदास ताळाम, रवि पंधरे, अजय पंधरे, उषा सडमाके, रोमा ताळाम, वैकल्ला पंधरे, सरीता सयाम, दुर्गा पंधरे, नंदना पंधरे, शालु कोवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment