सौंदड गावात फोफावले अतिक्रमण !


  • गाव नक्ष्या नुसार अनेकांनी रस्त्यावरच बांधली घर, कोण काढणार हा अतिक्रमण?

सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 15 जानेवारी 2023 : संपादकीय : रूद्र सागर न्युज पेपर, श्री. बबलू मारवाडे : ग्रामीण भाग आणि अतिक्रमण ही काही नवी गोष्ट नाही. मात्र वाढत्या लोक संख्येने गावातील मुख्य मार्गावर म्हणजेच रहदारीच्या ठिकाणी अतिक्रमण वाढल्याचे अनेक चित्र आपण पाहिले आहेत. पूर्वी ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांच्या जवळीक लोकांनी गाव नक्ष्यावर घरे बांधून मुख्य मार्गच बंद केले आहे. आता हे सामान्य माणसाचे अतिक्रमण असते तर ग्राम पंचायत ने तात्काळ काढली असती मात्र मोठ्या मगर मच्छ असलेल्या लोकांना कोण धडा शिकविनार हा देखील संशोधनाचा विषय आहे.

ग्राम पंचायतीच्या जागेवर देखील गावातील नागरिकांनी अतिक्रमण थाटून रहदारीस अडथळा निर्माण केला आहे. गावातील अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर आणि मार्गावरील असलेल्या नालीवर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याचे चित्र आहे. गावात राहणारे सर्व नागरिक हे आपलेच जवळीक आहेत. याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलेली कामे चुकीची नाही. गावात रहदारी असलेल्या मार्गावर असलेला अतिक्रमण काढणे ही जिम्मेदारी ग्राम पंचायत कार्यालय ची आहे.

मात्र गेली पाच वर्षे च्या कालावधीत ग्राम पंचायत कार्यालय सौंदड यांनी गावातील एकही टक्के अतिक्रमण काढल्याचे चित्र दिसत नाही. यावरून असे दिसते की स्वतः ग्राम पंचायत कार्यालय ही गावातील नागरिकांना अतिक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करते. गावात वाढत्या अतिक्रमणाने गाव मार्ग लहान होत चालले आहेत. गावात वाढती लोक संख्या आणि वाहतुकित सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील बरबाद चौक ते राका मार्गावर गेली अनेक वर्षे पासून अतिक्रमण वाढल्याचे चित्र आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने चालतात अश्यात देखील मुख्य मार्गावर अनेकांनी आपले साहित्य मुख्य मार्गावर ठेवल्याचे चित्र आहे. याच मुख्य मार्गावर देशी दारू दुकान धारकांचे वाहन नियमित उभी असतात. त्या मुळे देखील रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

गावाच्या मुख्य मार्गावर भाजी विक्रेते बसतात. त्या मुळे देखील वाहन धारक मुख्य मार्गावर आपली वाहने लाऊन भाजी व फळे खरेदी करतात. त्या मुळे देखील रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो. अनावधानाने एखाद्याचे जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण राईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

स्थानिक प्रशासनाने गावातील मुख्य मार्गावरील रहदारीस अडथळा निर्माण होणारा अतिक्रान तात्काळ काढल्यास वाहन धारकांना मोठा दिलासा मिळेल. अनेकांनी मुख्य मार्गावर पाल ठोकून दुकाने लावली आहेत, रेती, गिट्टी, विटा, माती, लाकडे नालिवर आणि मुख्य मार्गावर ठेवली आहे. मुख्य मार्गावर जनावरे नियमित बांधली जातात. नियमाने अतिक्रमाची व्याप्ती ही जरी वेग वेगळी असली तरी वाहन धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील ढोर फोडीत देखील काही लोकांनी जमिनी काढून अतिक्रमण केले आहे. ही जागा ग्राम पंचायतीच्या मालकीची आहे. ढोर फोडी साठी नीछीत केलेली जागा खाली करण्याचे अधिकार ग्राम सभेला आहेत. बाजार वाडीत देखील अनेक पान टपरी धारकांच्या ग्राहकांचे वाहने मुख्य मार्गावर उभी असतात.

त्या मुळे प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अश्या अनेक ठिकाणी वाढलेले अतिक्रण काढण्याची नितांत आवश्यकता आहे. त्या मुळे सामान्य माणसाला रहदारि करताना होणारी अडचण कायमची निघुन जाईल. गावात नवा बदल घडवून आणण्यासाठी कायद्याने कार्य झाले तरच सोईचे ठरेल. या पाच वर्षे पूर्वी असलेल्या महिला सरपंचाने गावातील अतिक्रमण काढण्याचे धाडस केले होते मात्र ते सफल झाले नाही.


 

Leave a Comment