जुगार अड्यावर धाड 12 आरोपी ताब्यात


गोंदिया, दिंनाक : 15 जानेवारी 2023 :  ग्राम टेमणी येथे अवैधरित्या तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर अड्ड्यावर दिनांक :14 जानेवारीच्या संद्याकाळी पोलिसांनी छापा कारवाई केली असता यात 12 इसम जुगार खेळत असताना मिळून आले. यामध्ये 1615 रु नगदी, 7 मोटार सायकल किंमत 3,25,000 रु व 4 मोबाईल किंमत 37,000 रु , असा एकूण किंमती 3,63,615/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.

यात आरोपी नामे 1) नरेंद्र जतपेले, टेमणी, 2) धरमदास मंडीये, चुलोद, 3) निलेश कोसरकार, श्रीनगर, गोंदिया, 4) ताराचंद ठाकूर, बरबसपुरा, 5)सचिन मेश्राम, छोटा गोंदिया, 6)सुनील धोंडे, विजय नगर गोंदिया, 7)महेंद भलावी, टेमणी, 8) दिलीप धावडे, चुलोद, 9)आशिष उके, संजयनगर गोंदिया, 10) आकाश भिमटे, छोटा गोंदिया, 11)जलिंग दमाहे, बरबसपुरा, 12) राजन लिल्हारे टेमणी. या आरोपी विरुध्द पो. ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 12 (अ ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे अप. क्र.18/2023 गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देश व आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया सुनील ताजने यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अजय भुसारी यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात सपोनि चव्हाण पोलीस अंमलदार स. फौं. मल्लेवार, गणवीर, पोहवा डिब्बे, बाहेकार, ना. पो का. नेवारे , बनोटे, कटरे ,चालक पो. हवा रामटेके यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment