चोरी झालेली मोटार सायकल मिळाली


गोंदिया, दिनांक : 14 जानेवारी 2023 :  07/12/2022 रोजी रात्र दरम्यान विद्या नगर, टि.बी. टोली गोंदिया येथील रहिवासी उदयराज प्रमोद कुलकर्णी वय यांची होंडा कंपनीची लिवो मो. सा. क्र. MH35-A-8173 कि. 40,000/-रु ची शिव शक्ती गारमेंटच्या समोर उभी ठेवलेली चोरी गेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अज्ञात आरोपी विरुध्द अपराध क्रं.777/2022 कलम 379 भादवि अन्वये दाखल करण्यात आला होता.

निखील पिंगळे पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटी करण पथकातील पोलीस अंमलदारांनी गोपनिय माहितीच्या आधारे सखोल तपास केल्यानंतर गुन्हयात चोरीस गेलेली होंडा कंपनीची लिवो मो. सा. क्र. MH35-A 8173 आरोपी नामे श्रीकांत अरुण बोरकर वय- २३ वर्षे रा. ता. देवरी जि. गोंदिया यांचेकडुन जप्त करण्यात आलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पो.ना. दिपक राहांगडाले ब.नं.318 पो.स्टे. गोदिया शहर यांनी केला असून सदर गुन्ह्यात जप्त मुद्देमाल मोटर सायकल मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी उदयराज प्रमोद कुलकर्णी वय ४८ वर्षे रा. विद्यानगर कॉलोनी टि.बी. टोली गोंदिया यांना दि.13/01/2023 रोजी पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशन ला सुपुर्दनाम्यावर देण्यात आलेली आहे.


 

Leave a Comment