वाहतुकीचे नियम मोडल्या मुळे तब्बल 818 वाहनावर कार्यवाई


गोंदिया, दिनांक : 11 जानेवारी 2023 : दिनांक : 1 जानेवारी 7 जानेवारी या सप्ताहात वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर विषेशतः विना लायसन्स वाहन चालविणारे वाहन चालक, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्न- कर्कश हॉर्न वाजविणारे , अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलीसांचा ईशारा न पाळणे, ईत्यादि वर कारवाई करून 417 पेड केसेस, 401 अनपेड केसेस अश्या एकूण 818 वाहतूक कारवाया करण्यात आलेल्या असून 3, 46, 200 रू चे शुल्क आकारण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे वाहतूक पोलीस फॅन्सी नंबरप्लेट, मॉडिफाइड सायलेन्सर लावणाऱ्या वाहनांचे नंबरप्लेट, व सायलेन्सर काढून घेण्याची व जप्त करण्याची प्रक्रिया राबवून घेत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे निर्देश, व आदेश अन्वये वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक महेश बनसोडे, यांचे मार्गदर्शना खाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार यांचे पथक यांनी केलेली आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, जनतेनी रहदारीचे व वाहतुकीचे नियम पाळावे. व संभाव्य अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस दलास वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे.


 

Leave a Comment