कर्ज बाजारी झाल्याने स्वतःच्या घरी केली चोरी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या


गोंदिया, दिनांक : 11 जानेवारी 2023 : दिनांक 8 जानेवारी ला 8 वाजता दरम्यान त्रिमूर्ती चौक गोरेगांव येथील रहिवासी फिर्यादी- रविंद्र कपुरचंद रहागडाले यांनी तक्रार दिली की, त्यांचे घरचे सगळे जण राधाकृष्ण मंदिर गोरेगांव येथे महाप्रसाद करीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरी करून सोन्याचे दागिणे व नगदी असा किंमती 1 लाख 30 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यावरून अज्ञात वेक्ती विरुध्द फिर्यादी यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन गोरेगांव येथे गुन्हा 15/2023 कलम 454, 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोलीस पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, म. पो. उप नि. सायकर, पो. उप.नि. जीवन पाटील , पो. हवा. बिसेंन, चालक बंजार यांचे पोलीस पथक तपास करीत असतांना, घटना स्थळास भेट देऊन आजू-बाजूचे परिसर व सी.सी. टी.व्ही. फुटेज ची तपासणी केली असता तक्रारदार – रविंद्र कपुरचंद रहागडाले हे त्या दरम्यान घरी येवून साधारण वीस मिनिटे थांबले असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.

यावरून तक्रारदार रविंद्र रहांगडाले यांना गुन्ह्या बाबत विचारपूस करून सखोल चौकशी केली असता त्यांनी कर्ज बाजारी झाल्याने स्वतःचे च घरी चोरी केल्याचे कबूली दिल्याने त्यास गुन्ह्यासंबंधा ने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विचारणा केली असता तक्रार करणाराच आरोपी यांनी स्वतः किमती 89 हजार 310 रूपयाचा मुद्देमाल काढून दिल्याने हस्तगत करून गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करण्यात आले आहे.

तक्रारकर्ता/आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचे पुढील तपासकामी गोरेगांव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास गोरेगांव पोलीस करीत आहेत. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरिक्षक विजय शिंदे, यांचे नेतृत्वातील स्थागुशा चे तपास पथकाने गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची भरीव कामगिरी बजावली आहे.


 

Leave a Comment