हरवलेले ६ मोबाईल शोधून पोलिसांनी केले मूळ मालकाला परत.


गोंदिया, दिनांक : ०९ जानेवारी २०२३ : 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस स्थापना दिवस सप्ताह साजरा करण्यात येत असून सदर सप्ताह चे औचित्य साधून पोलीस स्टेशन गोंदिया शहर पोलिसांनी पो. ठाणे गोंदिया शहर येथे दाखल झालेल्या गुम मोबाईल रिपोर्टच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून गुम झालेल्या मोबाईलचा शोध घेवुन ०६ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

१) गुम क्र. ८०७ / २०२१ अर्जदार श्री. पंकज राजेश घरडे यांचा Oppo A15 या कंपनीचा मोबाईल

२) गुम क्र.६०६ / २०२२ अर्जदार श्री. संदेश अरुण बोरकर यांचा Vivo Y21 T कंपनीचा मोबाईल

३)गुम क्र.६९९ / २०२१ अर्जदार श्री. दिनेश माधवराव तावाडे यांचा Vivo Y20 A कंपनीचा मोबाईल

४) गुम क्र.३९३/२०२२ अर्जदार श्री.आंचल प्रकाशसिंग चंदेल यांचा Vivo Y20 T कंपनीचा मोबाईल

५) गुम क्र. ७२०/२०२१ अर्जदार श्री.आशाचंद्र हंसराज डहाट यांचा Oppo A11K कंपनीचा मोबाईल

६) गुम क्र.६३२/२०२२ अर्जदार नामे सौ. फुलवंता संतोष वाघमारे यांचा Redmi 9A कंपनीचा मोबाईल

वरील सर्व हस्तगत करण्यात आलेले मोबाईल सबंधीतांना पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे बोलावुन चांगल्या स्थितीत त्यांचे कडे सुपुर्त करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई पोलीस स्थापना दिन सप्ताह चे औचित्य साधून मा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल ताजणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात स. पो. नि. अरविंद राऊत, राम व्होन्डे, विजय गराड गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, पो. शि. पुरुषोत्तम देशमुख, विकाश वेदक, मुकेश रावते यांनी विशेष मोहीम राबवून केलेली आहे.


 

Leave a Comment