लोहिया प्रायमरी शाळेत मुख्याध्यापक आढावा सभा संपन्न


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०९ जानेवारी २०२३ : शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद, गोंदिया द्वारा येथील लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, परिसरतील जय बजरंग सांस्कृतिक सभागृह, सौंदड येथे सडक अर्जुनी तालुक्यातील मुख्याध्यापक ( जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, खाजगी विनाअनुदानित, खाजगी स्वयं अर्थसाहाय्यित ) केंद्रप्रमुख, समन्वयक यांची तालुकास्तरीय आढावा सभेचे आयोजन ५ जानेवारी 2023 रोज गुरूवारला करण्यात आले.

या प्रसंगी आढावा सभेचे अध्यक्ष मा. डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) , जि. प. गोंदिया व प्रमुख उपस्थिती मा. जगदीश लोहिया, संस्थापक-संस्थाध्यक्ष, लो. शि. संस्था, सौंदड यांनी माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी मा. डी. बी. दिघोरे उप-शिक्षणाधिकारी ( प्राथ. ),  जि. प. गोंदिया, मा. विजय ढेकणे, दिव्यांग जिल्हा समन्वयक, गोंदिया, मा. बागडे साहेब, ग. शि. अधिकारी, सडक अर्जुनी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

आढावा सभेचे अध्यक्ष मा. डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) जि. प. गोंदिया यांनी ” शिक्षकाच्या जीवनाचे साफल्य आणि समाधान विद्यार्थ्यांच्या हितातच असते.” तसेच आढावा सभेच्या विषय पत्रिकेनुसार विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन तसेच सभेचे प्रमूख उपस्थिती मा. जगदीश लोहिया, संस्थापक यांनी ” विद्या ज्ञानाच्या पवित्र क्षेत्रात आपल्याला संधी मिळाली हे आपले भाग्य आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा.” असे मार्गदर्शन केले. सभेला तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment