विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य – माजी आमदार राजेंद्र जैन


गोंदिया, दिनांक : ०९ जानेवारी २०२३ : विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहेत त्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना गुणांना वाव मिळायला पाहिजे, विद्यार्थी हे बौद्धिक, मानसिक व शारिरीक दृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाचा व देशाचा आधारस्तंभ होतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधा, दळणवळणाची साधने इत्यादी वर मात करुन स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्याची जिद्द बाळगून शिक्षण घेतात ह्या विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घड़विने हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्रात उत्तम संधी आहेत. याकरीता विद्यार्थ्यांनी अभ्यासा बरोबरच क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

स्व.रूपचंदजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदिया व्दारा संचालित राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व एस. एस. टी. इंग्लिश स्कूल, सतोना च्या वतीने वार्षिकोत्सव स्नेह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. स्नेह सम्मेलनाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री जैन व उदघाटक संस्था सचिव श्रीमती टी.एस.तुरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.

या वर्षी ‘उदय‘ या संकल्पनेवर आधारित आकर्षणचा केंद्रबिंदु ठरलेले सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आले. साक्षरता, समाज जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता यासारख्या विविध विषयावर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केले.

वार्षिकोत्सव स्नेह सम्मेलनात प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, श्रीमती टी. एस. तुरकर, हनस ठाकरे, केतन तुरकर, नेहा तुरकर, रामलाल उइके, बलिराम उइके, गोवर्धन पटले, नूतनलाल तुरकर, एन. बी. बोपचे, जी. एन. चौहान, एस एन मानकर, गेडामजी, सुनील पटले, रौनक ठाकूर सहित पालक वर्ग, शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


 

Leave a Comment