अवैध दारूच्या हातभट्टीवर कार्यवाई 1 लाख17 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.


गोंदिया, दिनांक : 30 डिसेंबर 2022 : ग्राम तुमखेडा येथे दिनांक 26 डिसेंबर रोजी अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना, छापा कारवाई केली असता इसम नामे अतुल नागभिदे राहणार बनगाव हा आपले ताब्यातील मोपेड जुपिटर गाडीने दारू वाहतूक करताना मिळून आल्याने त्याची ताब्यातून जुपिटर गाडी किमती 70 हजार रुपये व देशी व विदेशी दारू किमत दहा हजार दोनशे वीस रुपये असा एकूण 80 हजार 220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपी नामे अतुल तुकाराम नागभिडे वय 25 वर्षे राहणार बनगाव याचे विरुद्ध पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 65 ( इ ),77( अ ), महाराष्ट्र दारूबंदी कायदा, सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच पोलीस ठाणे गंगाझरी हद्दीतील मौजा- बोरा नाला परीसरात दिनांक 27 डिसेंबर रोजी छापा कारवाई केली असता मोहफुलाची हातभट्टी लावून दारू गाळतांना इसम नामे शिशुपाल कुत्रे रा. बोरा हा मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून 20 लिटर मोहफुलाची हातभट्टी ची दारू, 350 किलो सडवा मोहफुल रसायन व साहित्य, असा एकूण किंमती 37, 500 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आले तसेच मोहफुलाचे रसायन, आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे.

आरोपी नामे शिशुपाल कांताचरण कुत्रे वय 52 वर्षे रा. बोरा याचे वर पो. ठाणे गंगाझरी येथे कलम 65 (ब),(क),(ड),(ई),(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अंमलदार पो. हवा. सोमेंद्रसिंह तुरकर, इंद्रजित बिसेन, चेतन पटले, पो. शि. अजय रहांगडाले, यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment