अवैध रेती तस्करांवर पोलीसांची कार्यवाई, 15 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.


गोंदिया, दिनांक : ३० डिसेंबर 2022 : आमगाव हद्दीतील मारबद घाट, बाघनदी च्या पात्रातून दिनांक 28 डिसेंबर रोजी काही लोक अवैधरित्या विना परवाना वाळू चे उत्खनन करून वाळू ची चोरी करीत आहेत. अशा खात्रीशीर माहितीच्या आधारे पदमपुर येथे व मारबद घाट, बाघ नदीपात्र परिसरात छापा कारवाई पोलिसांनी केली.  यात १) एक स्वराज कंपनीचा निळया लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 35/G-6888, ट्रॉली क्र. MH35/AR-3867 अंदाजे किंमती किं. 5 लाख रू व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किं. 4 हजार रुपये, २) एक स्वराज कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH- 35/G-7744, ट्रॉली क्र. MH-35/AG – 5180 अंदाजे किं. 5 लाख रू, ३) एक महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अंदा. किं. 5 लाख रू असे एकूण तीन ट्रॅक्टर चे चालक आरोपी नामे 1) विनेश प्यारेलाल ब्रम्हईया वय 26 वर्ष रा. गणेशपुर ता. आमगाव, 2) सतिश कुंजीलाल बागडे, वय 35 वर्षे रा. पदमपुर, ता. आमगाव, 3 ) सुभम ज्ञानेश्वर बागडे वय 25 वर्षे रा. पदमपुर, ता. आमगाव यांचे ताब्यात अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून, गौण खनिज वाळू ची चोरी करून वाहतूक करतांना व नदीपात्रात वाळू भरतांना मिळून आल्याने तिन ट्रॅक्टर, किंमती 15 लाख रू व एक ब्रास वाळू किमती 4000/- रू.  असी एकूण किंमती 15 लाख 4 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी ट्रॅक्टर चालक आरोपी क्र.1 ते 3 यांचेविरुद्ध पो. स्टे.आमगाव येथे कलम 379, 34 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून आमगाव पोलीस यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत. सदर ची कारवाई वरिष्ठांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात विशेष पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा. महेश मेहर, पो. ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा. पो. शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment