महामार्गावरील उभ्या वाहनावर कार्यवाई कोण करणार?


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : १२ डिसेंबर २०२२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने उभे लावलेली असतात. ही वाहने अपघाताला कारणीभूत ठरतात. राष्ट्रीय महामार्गावरील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या आत मध्ये नियमित वाहने उभी दिसतात. ही वाहने रायपुर वरून नागपूर कडे आणि नागपूर वरून रायपुर कडे जाणारी असतात. नियमानुसार राष्ट्रीय महामार्गावर लावलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या बाहेर ही वाहने उभी केली पाहिजे.

मात्र अनेकवेळा तसे होत नाही. परिणामी अनेक वाहन धारक किराणा वा भाजीपाला घेण्याच्या घाईत आपली वाहने मुख्य मार्गावर लावतात. अश्यात मुख्य मार्गावर लावलेल्या वाहनामुळे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन धारकाचे उभ्या वाहनाला धडकून अपघात होणे निचित आहे. अश्यात मृत्यु देखील निचित आहे. मुख्य मार्गावर उभी वाहने श्रीरामनगर ते कोहमारा या मार्गावर नियमित  पाहण्यासाठी मिळतात. राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा टी-पाईन्ट ते नवेगावबांध टी-पाईन्ट वर मुख्यता ही वाहने उभी असतात.

या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी देखील आपली सेवा देत असतात. तरी देखील या भागात हे वाहने उभी अश्ल्याचे दिसतात. परिणामी या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य मार्गावर लावलेल्या वाहन धारकावर कारवाई ची मागणी प्र्वासियांकडून होत आहे.


 

Leave a Comment