निवडणुकीच्या काळात वाळू चोरांना आले सुगीचे दिवस?


सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 12 डिसेंबर 2022 : तालुक्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने महसूल कर्मचारी आणि अधिकारी वर्ग वेस्त आहेत. अश्यात वाळू चोरांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहेत. तालुक्यातून सध्या वाळू चोरी जोमात चालू असल्याचे चित्र आहे. त्या मुळे महसूल विभागाने जरा या कडे देखील लक्ष्य देण्याची गरज आहे. रात्रीला वाळू चोरी होत असली तरी दिवसा ढवळ्या विना परवाना वाळू चोरी चालू असल्याचे चित्र आहे. त्या मुळे महसूल विभागाचे सध्या सर्रास दुर्लक्ष्य होत अश्ल्याचे चित्र आहे. तालुक्यातून विना परवाना गौण खनिज चोरी चालू अश्ल्याचे चित्र आहे. यावर कार्यवाई करण्याची मागणी होत आहे.


 

Leave a Comment