वनरक्षक निवास स्थान झाले मोकाट प्राण्यांचे निवांत स्थान !


सौन्दड, सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : २६ नोहेंबर २०२२ : तालुक्यातील रेंगेपार पांढरी येथील वनविभागाचा वनरक्षक निवास स्थान दुरुस्तीपासुन आज पर्यंत रिकामा आहे. या ठिकाणी कुणीही राहत नसल्या कारणाने आज स्थितीत मोकाट प्राण्यांचा निवांत स्थान बनल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर बसलेला रेंगेपार ( पांढरी ) हे गाव असून, लागूनच नागझिरा व्याघ्र अभ्यारण्य आहे.

त्याकारणाने विवीध वनसंपदेने नटलेला हा परीसर आहे. लाकुड चोरीपासुन तर रेती, मुरूम तस्करी पर्यंतच्या बरेचश्या घटना पुर्वी येथे घडलेल्या आहेत. रेंगेपार येथे, नागझीरा व्याघ्र अभ्यारण्यात पर्यटकांना जाण्यासाठी फाटक होती. शिवाय पुर्वी वनविभागाचा नाका येथे असल्या कारणाने वनरक्षक निवास स्थान बांधण्यात आले. सुरवातीला वनरक्षक येथे वास्तव्यास असायचे, त्यामुडे मोठ्या प्रमाणात जंगलातील चोरी वर आडा बसायचा.

मागील १५ ते १६ वर्षापासुन येथे कोणीहि कर्मचारी राहत नाहि. वरुन वनविभागा अंतर्गत काहि वर्षापुर्वी लाखों रुपये खर्च करुण, या वनरक्षक निवास स्थानाची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली होती. निवासस्थानाला राहण्या योग्य बनविण्यात आले. पण त्या दिवसांपासुन तर आज पावेतो, येथे राहण्याकरीता कोणी फिरकलाच नाहि असी चर्चा आहे. वनरक्षक निवासात, बिट वनरक्षक राहत नसल्या कारणाने, लाकुडतोडी पासुन तर रेती चोरांना सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. बिटामध्ये वनमजुर फिरकतांनी दिसतात, पण वनरक्षक आपल्या बिटामध्ये केव्हा येतो व केव्हा निघून जातो? याकडे राउंड आंफिसर एस. झेड. वलथरे यांचा मुद्दामहि लक्ष नसल्याचे स्थानिकांत बोलले जात आहे. तरीपण वनविभागाणे त्वरीत यावर काहितरी उपाय योजना करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केले आहे.

पुर्वी रेंगेपार येथील फाटक पर्यटकांसाठी सुरु होती, त्या कारणाने सड़क अर्जुनी तालुक्यातील, तसेच आजुबाजुच्या तालुक्यातील पर्यटकं मोठ्या प्रमाणात येथूनच नागझिरा व्याघ्र अभ्यारण्यात,पर्यटनांसाठी यायचे. पण कालांतराणे हि फाटक पर्यटकांसाठी बंद करण्यात आली, त्या कारणाने पर्यटकांना लांब अंतराच्या मोठ्या फेर्यांने, अभ्यारण्यात दाखल व्हावे लागत आहे. हि फाटक पर्यटकांसाठी कधी ऊघडणार याकडे पर्यटकांचे लक्ष आजहि लागून आहे..!

हा परिसर, मोठ्या प्रमाणात वनसंपदेने नटलेला असल्या कारणाने, तसेच जंगलातील चोरीवर आडा बसावा या उद्देशाने, पुर्वी वनविभागाची रात्रीची गस्त पहावयास मिडत होती. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात रेती तस्करी वर अंकुश लागल्या सारखे वाटत होते. पण आज ति रात्रीची गस्त चा वनविभागाला विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.


 

Leave a Comment