लोहिया विद्यालयात सेवानिवृत्त्ती सत्कार कार्यक्रम संपन्न


गोंदिया, दिनांक : २३ नोहेंबर २०२२ : सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथील उच्च माध्यमिकचे सहाय्यक शिक्षक प्राध्यापक तुलाराम मनिसा चांदेवार हे ऑक्टोबर 2022 अखेरीस सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम लोहिया शिक्षण संस्था व विद्यालयाच्या वतीने सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 ला विद्यालयात आयोजित करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक- संस्थाध्यक्ष, लो. शि. संस्था, सौंदड यांच्या शुभहस्ते प्राध्यापक टी. एम. चांदेवार यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष लो. शि. संस्था, नरसिंगदास अग्रवाल,  पंकज लोहिया, संस्था सदस्य, अनिल दीक्षित, सचिन लोहिया, ग्रा. पं. सदस्य, प्रल्हाद कोरे, पठाण साहेब, बाबुराव हरणे सर, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथिं तसेच विद्यालयातील एन. डी. अलोणे, डी. एस. टेंभुर्ण, यु. आर. बाच्छल व्हि. एफ. घनमारे जी. एस. कावळे यांनी, प्राध्यापक श्री. टी. एम. चांदेवार यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक श्री. टी. एम. चांदेवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्था व संस्थेच्या कार्यकारिनीचे पदाधिकारी व सदस्यगन, निमंत्रित पाहुणे तसेच विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स.शि. यू. बी. डोये यांनी केले, तर आभार स. शि. टी. बी. सातकर यांनी मानले.


 

Leave a Comment