त्या वाळू चोरांना तळीपार करा पोलीस अधीक्षक गोंदिया यांना लेखी तक्रार


गोंदिया, दिनांक : २३ नोहेंबर २०२२ : सौन्दड गावातून अवैध रित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर कायदेशीर कार्यवाई करण्याबाबाद लेखी स्वरुपाची तक्रार पोलिश अधीक्षक निखील पिंगळे गोंदिया यांच्याकडे तक्रारदार बबलू बाबुराव मारवाडे, पत्रकार तथा संपादक, महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्र सागर न्यूज पेपर यांनी दिनांक : १६ नोहेंबर रोजी इमेल वरून तर २२ नोहेंबर २०२२ रोजी प्रतेक्षात दिली आहे.  तक्रारीत काय म्हंटले आहे ते खालील प्रमाणे पाहू :  माझ्या गावा लगत चुलबंद नदी आहे. या नदीच्या सौन्दड नर्षरी, फुटाळा या बंद नदी घाटातून. अवैध रित्या रोज ट्रकटर च्या माध्यमातून वाळू उपसा केला जाते. आणि तो ट्रक मध्ये भरून बाहेर चढ्या भावाने बाहेर विक्री करिता पाठविली जाते. याचे डम्पिंग सौन्दड ग्राम पंचायत च्या ढोर फोडीतून होते. या बाबद मी अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत. मात्र तालुका प्रशासन या बाबीची गंभीर रित्या दखल घेत नश्ल्याने वाळूची चोरी रोज जोमात चालूच आहे.

ही चोरी सौन्दड येथील १ ) सुधाकर चांदेवार वय वर्ष ५५, २) राजेंद्र भेन्डारकर उर्फ बापू वय वर्ष ४५, ३) सदाशिव विठ्ठले वय वर्षे ५० ( भाजप कार्यकर्ता ) ,४ ) फुटाळा येथील दीपक गहाने वय वर्ष ४५ ( तळीपार ) भाजप कार्यकर्ता, ५ ) श्यामकुवर मेंढे चिखली वय वर्षे ५० ( भाजप ) तर  यांना वाळू चा वेवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य करणारे सौन्दड येथील सरपंच गायत्री एकनाथ इरले वय वर्ष ४५ अं. असे असून मी वारंवार बातम्या लावल्या मुळे प्रशासन अवैध वाळू वाहतुकीवर कार्यवाई करते. त्या मुळे यांच्या वेवसायात घाटा निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्या मुळे पत्रकार बबलू बाबुराव मारवाडे याचा कायमचा बंदोबस्त आपण सर्व मिळून करू. अशी खात्री लायक माहिती सूत्रांनी मला या महिन्यात दोन वेळ दिली आहे. करिता मा. साहेब. मला आणि माझ्या परिवारावर वरील लोकांपासून धोका निर्माण झाला आहे. त्या मुळे कुठलीही घटना झाल्यास वरील नमूद लोक याला जबाबदार राहतील. याची दखल घ्यावी आणि अश्या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कार्यवाई करून त्यांना तळीपार करावे ही विनंती लेखी पत्रातून केली आहे.

बातम्या न लावण्यासाठी मला या लोकांनी एका अज्ञात वेक्तीच्या माध्यमातून ऑफर देखील दिली आहे. मी त्याच ऑफर न स्वीकारल्याने सौन्दड आणि फुटाळा येथील काही वाळू माफिया पत्रकाराचा काटा काढण्यासाच्या तयारीत आहेत. त्या मुळे पोलिश विभागाने वरील ६ लोकांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अवैध वाळू उत्खनन मुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पात्रात सामाऊन जात आहेत. तर नदी पात्रात वाळू शिल्लक न राहिल्यास पाण्याची पातळीत घट होत आहे. त्यातच गाव मार्गाची दयनीय अवस्था होत आहे. वातावरणात होत अश्लेल्या बदलला मुळे अवैध उत्खनन जबाबदार आहे. या अवैध उत्खनना मुळे प्रशासनाला रोज लाखोचा चुना देखील लागत आहे. त्या मुळे प्रशासनाणे सामान्य जनतेला आणि मला होणाऱ्या त्रासाला लक्ष्यात घेता कार्यवाई करावी ही विनंती केली आहे.

वरील अवैध वेवसाय करणाऱ्या लोकांनी या पूर्वी देखील माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तर मला जीवेनाशी मारण्याच्या उद्देश्याने गोंदिया येथील एका वेक्तीला २.५० लक्ष रुपयाची सुपाळी देखील दिली होती. त्यातच atrositi, ३५३, ३५४, ३७६, ३०७ आणि पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याचे या लोकांनी प्रयत्न केले आहेत. यात आपल्या विभागातील काही अधिकारी कर्मचारी देखील या लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचा सीडीआर रेकॉर्ड चेक करावा आपल्या समोर सर्व सत्य येईल. असे ही १५ पानांच्या लेखी तक्रारीत म्हंटले आहे.


 

Leave a Comment