लाचलुचपत प्रतिबंध विभाग, भंडारा यांचे कडून जनजागृती


  • भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह संबंधाने पथनाट्य सादर

भंडारा, दिनांक : 04 नोहेंबर 2022 : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग चे दिनांक 17/10/2022 चे परिपत्रकान्वये संपूर्ण राज्यात दिनांक 31/10/2022 ते 06/11/2022 पावे तो दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे दिनांक 02/11/2022 भंडारा जिल्ह्यातील ग्राम 1) कोंढा/कोसरा, 2) मोहाडी तसेच 3) भंडारा शहरातील शुक्रवारी येथील किसान चौक येथे “भंडारा युवक बिरादरी” यांचे पथनाट्य सादर करण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार प्रतिबंध करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच सामान्य जनतेमध्ये भ्रष्टाचार करणारे लोकसेवक त्यांचे विरुद्ध लाचालुचपत प्रतिबंध विभाग येथे येऊन तक्रार देण्याचे किंवा भ्रष्टाचारा संबंधाने तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमादरम्यान भंडारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप-अधीक्षक महेश चाटे व त्यांचे कार्यालयीन सहकारी अधिकारी/कर्मचारी यांनी जनतेला कोणताही सरकारी अधिकारी/कर्मचारी आपणास शासकीय शुल्का व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभाग, भंडारा येथे आमचे टोल फ्री क्रमांक 1064 किंव्हा कार्यालचे दुरध्वनी क्रमांक -07184-252661 वर करण्याबाबत आव्हान केले.


 

Leave a Comment