कृषी मंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शुभम मेश्राम यांची चुनावी निवड.


गोंदिया: दिनांक : ०४ नोहेंबर २०२२ :  यूनीसेफ़ ( संयुक्त राष्ट्र बाल कोष ) व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र युवा संसद यांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र युवा संसद यांचे आयोजन मुबई येथे १४ ते १५ नोव्हेंबर ला दोन दिवशीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या सरावी संसदेचे करण्याचा उद्देश असे की राजकीय आणि वित्तीय नियंत्रण संस्था बाबीतील माहिती घेणे व स्वत कृतीद्वारे करून दाखवणे, प्रशासनावर नजर, माहिती विषयक अधिकार, विकासात्मक कार्ये, सामाजिक आभियांत्रिकीद्वारा समाज परिवर्तन, वित्तपुरवठ्यावर नियंत्रण, तरुण युवांना राज्यातील राजकारण, संसदेमधील कारभार, नवीन कायदे निर्माण करणे व लागू करणे, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व त्यांचे समाधान, संसदेचे कार्यभार,कार्यप्रणाली, आपण कश्या प्रकारे देश चालवू सकतो, संसदेत कश्या प्रकारे मांडता येणार त्या साठी सराव संसदेचे आयोजन करण्यात आले.

त्यात प्रत्येक जिल्ह्यातून दोन तरुण युवकांची निवड करणायत आली. असे ऐकून बहात्तर तरुणांनी विविध क्षेत्रातील अभ्यास व कौशल्य दाखवत भाग घेतला. त्या मध्ये गोंदिया जिल्हामध्ये शुभम मेश्राम यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री या पदासाठी अर्ज केले होते. तर श्रद्धा शहारे यांनी पंचायतराज व ग्रामविकास मंत्री या पदासाठी अर्ज केले. संबधित खात्यासाठी जिल्हा युवा अधिकारी मा. श्रुती डोंगरे यांनी दोन्ही होतकरू तरुण युवकाचे त्या क्षेत्रातील अभ्यासाकरिता मदत केली. शुभम मेश्राम यांनी १) दर्जेदार बियाणे खते कीटक नाशके वेळेवर पुरवठा, २) ट्रॅक्टर व शेती उपयोगी अवजारांसाठी कोणत्याही अटी शर्ती न ठेवता तात्काळ अनुदान. ३) कोणत्याही शेतकरी कुटुंबाचे सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास रेंगाळणारी विमा पद्धती बदलून एक आठवड्याच्या आत शेतकऱ्याच्या वारसांना विमा रक्कम सुपूर्त ४) शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव व विक्री पद्धतीत पारदर्शकता आणण्याचे काम व शेतकऱ्यांचे आर्थिक हित ५) ) शेतकऱ्याना शेतकरी आत्महत्या थांबावं म्हणून सरकार प्रयत्न ६) शेतपिक नुकसान भरपाई असे शेतकऱ्यांची बाजू मांडत वरील सर्व आश्वासने मतदाराच्या सामोर ठेवेले व सर्वाना शेतकरी हिताचे धोरण समजले.

१ नोव्हेंबर ला ऑनलाइन पद्धतीने मत टाकून बहात्तर तरुणांनी, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, लोकसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेता, सचिव कार्यालय, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, पंचायतराज व ग्रामविकास मंत्री, व इतर सर्व पंचवीस मंत्री पदाकरिता मत टाकण्यात आले व ३ नोव्हेंबर ला त्याचा निकाल जाहीर करण्यात आले. त्यात गोंदिया जिल्हातील शुभम मेश्राम यांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री या पदाकरिता सर्वाधिक मत घेऊन मंत्री पदाची शपथ हे घेणार आहेत. व येत्या १४ व १५ तारखेला मुबई येथे शेतकासाठी काही करून दाखवण्याच्या जिद्दीने सरावी संसदेत दाखल होणार आहे.


 

Leave a Comment