एकाच ठिकाणी दोन बॅनर मग एकच का? फाडला गेला


सडक अर्जुनी, गोंदिया : दी. 25 ऑक्टोंबर 2022 : अर्जुनी मोर. विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात दिवाळी निमित्ताने जनतेला शुभेच्या देण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. ते बॅनर अज्ञात वेक्त कडून फाडण्यात आल्याचे चित्र आहे.



जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील शेंडा मार्गावर हा बॅनर फाडण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी दोन बॅनर लावण्यात आले आहेत. एक बॅनर भाजप चे माजी मंत्र राजकुमार बडोले यांचा तर दुसरा आमदार नमोहर चंद्रिकापुरे यांचा आहे.

त्यातील भाजप चे माजी मंत्री गेली 10 वर्षे या भागात आमदार होते. आता राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत. चंद्रिकापुरे यांनी बोलताना सांगितले की बॅनर कोण फाडले ते विचार करण्याची गरज नाही. ते सर्वांना समजते. मात्र बॅनर फाडून काही फरक पडणार नाही.

त्या मुळे आम्हाला ही काही फरक पडत नाही. आमदारांनी न बोलता विरोधकांवर निशाणा साधला आहे. मात्र बॅनर फाडणारा कोण हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पूर्वी देखील अनेक बॅनर या कथित लोकांकडून फाडण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले आहे. तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांन मध्ये सध्या वाद सुरू असल्याची चर्चा आहे.


 

Leave a Comment