तक्रारी नंतर बँकेने लावला RTI चा बोर्ड


माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसुरकर
यांच्या पाठ पुरव्याला यश…


नांदेड, दी. 25 ऑक्टोंबर 2022 : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसुरकर हे आपल्या वयक्तिक कामानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बाराहळी ता. मुखेड या शाखेत गेले असता.

त्यांना बँकतील दर्शनी भागात माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४/१/ ख अंतर्गत कायदा पारीत झाल्यानंतर १२० दिवसाच्या आत माहीती अधिकारचा बोर्ड लावणे बंधनकारक असताना सुद्धा बँकेत दर्शनीय भागात बोर्ड दिसत नव्हता त्या बद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसुरकर यांनी बेंकेतील कर्मचाऱ्यांना या बाबद विचारले असता त्यांना काही उत्तर मिळाले नाही.

त्यानंतर शिंदे यांनी संबंधित वरीष्ठ कार्यालयाकडे सविस्तर तक्रार व पाठपुरावा केला. त्यानंतर शिंदे यांनी माहिती अधिकार अर्ज करून RTI बोर्ड बद्दल विचारले असता.

शाखेत RTI चा बोर्ड लाऊन बँकेने माहिती अधिकार कार्यकर्ते विलास शिंदे वसुरकर यांना लेखी उत्तरात कळविले आहे. जागरूक नागरिक देशाचा भविष्य असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. माहिती अधिकार कायद्यात तरतूद असताना देखील अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात येत नाही. त्या मुळे सामान्य माणसाला अर्ज लावायचा असल्यास मोठी अडचण होते.


 

Leave a Comment