गोंदिया; कोहमारा मार्ग ठरतोय धोकादायक !


सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 15 ऑक्टोंबर 2022 : तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 753a हे सध्या धोकादायक ठरत आहे. या मार्गाचे नुकतेच नव्याने काम करण्यात आले. मात्र मार्गाच्या कडेला मुरूम न टाकल्याने दलदल निर्माण झाल आहे. अश्यात अरुंद मार्गावरून धावणारी वाहने ही एकाच वेळी ओवर टेक करताना मार्गाच्या कडेला उतरतात. अश्यात दलदल झालेल्या जागेत वाहनाचे चाके खोलवर गाडली जातात. त्या मुळे अवजड वाहन पलटी होण्याच्या मार्गावर असतात.

या पूर्वी या ठिकाणी अनेक वाहने अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सदर जागेवर मुरूम टाकून जागा दणकट करण्याची मागणी होत आहे. काही दिवसा पूर्वी याच ठिकाणी अवैध रित्या मुरूम टाकणाऱ्या तीन वाहनावर विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. तो मुरूम वन विभागाच्या जागेतील होता. तालुक्यात मुरूम उत्खनन करण्यासाठी सध्या परवाना उपलब्ध नाही. त्या मुळे अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनावर कारवाई केली जाते.

या बाबद अधिक माहिती करिता दिलीप निंबाळकर : उप अभियंता : सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांच्याशी भ्रमण ध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की गोंदिया जिल्ह्यात मूरूम उत्खनन आणि वाहतूकी करीता सध्या परवानगी नाही. त्या मुळे सध्या काहीच करता येत नाही. या पूर्वी आम्ही मुरूम टाकण्यासाठी काही लोकांना सांगितलं होत. मात्र त्या वाहन धरकांवर कारवाई करण्यात आली होती. आम्ही प्रयत्नात आहोत. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये हाच आमचा हेतू आहे. असे दरम्यान त्यांनी सांगितले. मात्र रोडच्या कडेला तय्यार झालेले खड्डे वाहन धारकांसाठी धोकादायक ठरत आहे. गोंदिया कोहमारा मार्गावरील ग्राम डव्वा जवळील हे दृश्य आपण पाहू सकता एक ट्रक रोडच्या खाली उतरल्याने ते चिखलात फसले आहे. यावेळी या वाहनाचा अपघात देखील होऊ शकत होता.


 

Leave a Comment