8 हजार क्विंटल धान घोटाळ्या प्रकरणी १५ लोकांवर गुन्हा दाखल.


सालेकसा, गोंदिया, दिनांक : १५ ऑक्टोंबर २०२२ : जिल्ह्यात धान घोटाळ्या प्रकरणी नव नवीन गुन्हे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे धान घेताना शेतकऱ्यांना लुबाडणे व शासनालाही लुटणे, या दोन्ही गोष्टी एकाच सोबत करणाऱ्या सालेकसा येथील समृद्ध किसान शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सेवा सहकारी संस्था मर्यादित सालेकसा च्या अध्यक्ष, सचिवासह 15 संचालक मंडळावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) वासुदेव महादेव चुटे, २) भोजलाल बघेले, ३ ) घनश्याम बहेकार, ४ ) रोशनलाल वसंतराव राणे,  ५ ) प्रेमलाल तुरकर, ६ ) घनश्याम नागपुरे, ७ ) राजेंद्र बहेकार, ८ ) खेमराज उपराडे, ९) दालचंद मोहारे, १० ) ग्यानीराम नोणारे, ११ ) उमेश लहू बलथरे व्यवस्थापक जगदीश खोब्रागडे, १२ ) ग्रेडर अजय भरत फुंडे सह अन्य असे १५ लोकांवर जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी यांच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या आरोपीवर दीड कोटी रूपयाचा तब्बल  8 हजार क्विटला धान गायब केल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या वर सालेकसा पोलिस स्टेशन मध्ये काल १४ ऑक्टोंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पूर्वी रेखलाल टेंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर जिल्ह्यातील अनेक संस्थांनी गैर प्रकार केल्या प्रकरणी धान्य खरेदी करिता त्यांचे अधिकार गोठविण्यात आले होते. यावरून असे लक्ष्यात येते की गोंदिया जिल्यात धान माफियांचा चांगलाच बोलबाला आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन आपल्या कामाला लागला आहे.


 

Leave a Comment