सौन्दड; राष्ट्रीय महामार्गावर उभे वाहन ठरतात धोकादायक !


सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 15 ऑक्टोंबर 2022 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 हे गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाते अश्यात हा मार्ग तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर पासून ते कोहमारा ते देवरी तालुक्यात असा हा मार्ग जातो. हा मार्ग सध्या चार पदरी मार्ग आहे. अश्यातच महामार्गावर चालणारे वाहने मोठ्या प्रमाणावर असतात.

काही वाहन धारक हॉटेल मध्ये थांबतात मात्र अश्यावेळी आपली वाहने सुरक्षित जागेवर उभे न करता मुख्य मार्गावरच उभे करतात. अश्यात मार्गावर उभी वाहने अपघाताला कारणीभूत ठरतात. ही वाहने हटविण्याची जबाबदारी महामार्ग पोलिसांची आहे. मात्र पोलिस विभाग या कडे सातत्याने दुर्लक्ष करीत आशयाचे पाहण्यास मिळत आहे. श्रीरामनगर पासून कोहमारा ते डोंगरगाव डेपो पर्यंत ही वाहने मुख्य मार्गाच्या कडेला  उभी पाहण्यासाठी मिळतात. या उभ्या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी वाहन धरकांकडून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाहने पांढऱ्या पट्याच्या आत मध्ये लावलेली दिसतात.  अश्यात भरधाव वेगात धावणारे वाहन मुख्य मार्गावर उभे वाहनावर आदडल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे पोलीस विभागाने कार्यवाई करावी असी मागणी होत आहे.


 

Leave a Comment