आ. कोरोटे यांच्या कार्यालयात भाजपच्या महिला तालुका उपाध्यक्षा सह अनेकांचा पक्ष प्रवेश.


देवरी, गोंदिया, दिनांक : २७ सप्टेंबर २०२२ : कॉंग्रेस पक्षाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या कार्यालयात दिनांक : २५ सप्टेंबर रोजी भाजपच्या देवरी महिला तालुका उपाध्यक्ष सुषमाताई वैद्य यांच्या सह अनेकांनी कॉंग्रेस पक्षावर आणि आमदार कोरोटे यांच्यावर विस्वास ठेवत पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी हेमीनताई जुळा, दिलीप जुळा, गोपी पातोडे, संदीप तवाडे, पृथ्वी राऊत, संतोष वैद्य पाऊडदौना, हिवराज रामटेके, राजकुमार रामटेके, अरुण बोरकर, विनोद खोब्रागडे, नरेंद्र रामटेके, देवेंद्र मडावी देवाटोला या भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

गणेश भेलावे सदस्य जिल्हा काँग्रेस कमेटी व नवनियुक्त देवरी महिला कांग्रेस कमेटी च्या अध्यक्षा सुनंदाताई बहेकार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केल आहे. या प्रसंगी उपस्थित गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते संदीप भाटिया अध्यक्ष देवरी तालुका कांग्रेस कमेटी, रामेश्वर बहेकार माजी पं.स. सदस्य, बळीरामजी कोटवार महासचिव जिल्हा कांग्रेस कमेटी, राजु काळे, शिवचरण खैरे सरपंच, सुभाष वैद्य सह अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment