‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच कुलदीप पटले यांच्या हस्ते संपन्न.


गोंदिया, दिनांक : २७ सप्टेंबर २०२२ : घरातील स्त्री विशेषतः माता ही संपूर्ण घराचा आधार असते. त्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्त्री-शक्तीचा जागर असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्यातील सर्व माता-भगिनी विशेषतः गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिनांक २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियाना अंतर्गत वय वर्ष १८ च्या पुढील सर्व माता-भगिनींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून सर्व माता-भगिनींनी विशेषतः गरोदर मातांनी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयात जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा. नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस हे अभियान चालणार आहे.  त्यामुळे या अभियानाचा फायदा अधिकाधिक मातांना व्हावा आणि स्थानिक पातळीवर या योजनेची माहिती सर्वांना मिळावी, यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावे असे आव्हान सरपंच कुलदीप पटले यांनी दरम्यान बोलताना केले.

ग्राम पंचायत कार्यालय गर्रा बु. येथे दिनांक ; २६ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. दरम्यान सरपंच कुलदीप पटले यांचा हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी डॉक्टर महेंद्र मौजे ( उपकेंद्र गर्रा बु.,गड़पायले मेडम, प्रियाताई ( आंगनवाड़ी सेविका, येडे ताई, राहंगडाले ताई, जावरकर ताई, व गावातील महिला उपस्थित होत्या.


 

Leave a Comment