एक तास राष्ट्रवादीसाठी; विकासासाठी द्या – खा. प्रफुल पटेल


भंडारा, प्रतिनिधी : दिनांक ; २७ सप्टेंबर २०२२ : भंडारा स्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्ता कडून स्वागत करण्यात आले.

यावेळी भंडारा जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्ताकडून खा. पटेल यांनी विविध समस्याची जानकारी घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच श्री पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधतांना म्हणाले की, एक तास राष्ट्रवादीसाठी,आगामी भंडारा शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रभावी – प्रगल्भ पुरोगामी विचारांसाठी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

या माध्यमातून आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि शहर, तसेच जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी विचारमंथन करावे, असेही आवाहन श्री पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने सामोरे जाण्याकरिता प्रभाग निहाय पक्ष संघटन बळकटीची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी.

सत्तेचा मार्ग हा संघटन मजबुतीतून जात असतो म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्ष संघटने करीता वेळ द्यावा. या बैठकी प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुधे, मधुकर कुकड़े, राजुभाऊ कारेमोरे, गंगाधर परशुरामकर, धनंजय दलाल, सुनील फुंडे, ॲड जयंत वैरागडे, अनिल बावनकर, अविनाश ब्राम्हणकर, महेंद्र गडकरी, सरिता मदनकर, डॉ रविंद्र वानखेडे, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, लोमेश वैघ, राहुल निर्वाण, आरजु मेश्राम, दयानंद नखाते, महादेव पचघरे, ॲड नेहा शेंडे, सौ रत्नमाला चेटूले, किर्ती गणविर, सचिन बावनकर, हेमंत महाकाळकर, चेतक डोंगरे, जवाहर निर्वाण, विजय पारधी, शैलेश मयुर, विजय सावरबांधे,

अबरार एहमद, जुगल भोंगाडे, प्रदिप सुखदेवे, राजु पटेल, उमेश ठाकरे, लोकेश खोब्रागडे, संजय बोंद्रे, प्रभाकर सपाटे, बबन मेश्राम, हितेश सेलोकर, ईश्वर कळंबे, प्रभाकर बोदेले, गणेश चौधरी, गणेश बानेवार, महेंद्र बारापात्रे, सुनील शाहारे, अमन मेश्राम, डॉ पोर्णिमा वाहाणे, अश्विन बांगडकर, किरण वाघमारे, राजेश वासनिक, सोनू कनोजे, रोशन वासनिक, विवेक राघुते, राजेंद्र राकडे, ओमप्रकाश चव्हाण, रवि लक्षणे, लोकेश नगरे, अंबादास मंदुरकर, उमराव आठोडे, माधवराव भोयर, मंजुषा बुरडे, विघा साखरे, किरण साखरे, इंदू येरकडे,

पौर्णिमा येरकडे, निशा राऊत, विशाखा राउत, मंगेश रेहपाडे, राकेश लुटे, शिवशंकर शाहारे, संजय रेहपाडे, निखिल शेंडे, शरद मेश्राम, राजेंद्र खोब्रागडे, ज्योती टेंभूर्णे, सदेशना गजभिये, रुचिका ठवरे, पुण्यशिला कांबळे, किर्ती कुंभरे, राजेश्री राकडे, सारिका साठवने, मंजुषा डबले, भोजराज वाघमारे, प्रशांत मेश्राम, सुधीर तांडेकर, प्रशांत गजभिये, अतुल नारायण, शाहरुख शेख, परमेश्वर शेंडे, आनंदराव किरसने, गुड्डु भाई सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment