सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०८ सप्टेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम डोंगरगाव/खजरी येथे दिनांक : ०७ सप्टेंबर रोजी ४१ लक्ष रूपये किमतीच्या निधीतून नव्याने तय्यार करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आ. मनोहर चंद्रीकापूरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
१) शंकर फुंडे ते जगदीश खोटेले यांच्या घरा पर्यंत १० लक्ष रुयाच्या निधीतून सिमेंट मार्ग. २) चीरचाडी रोड ते उमरझरी नहारा पर्यंत रस्ता खळी करण आणि सिमेंट मार्गाचे बांधकाम १० लक्ष रुपये. ३) बाबुराव लांडगे ते सिंधू सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड बांधकाम व पेविंग ब्लॉक काम १० लक्ष रुपये. ४) मेन रोड ते गणपत कोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट मार्गाचे बांधकाम ३ लक्ष रुपये. ५) नीलकंठ कोरे ते दिनदयाल कोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट मार्गाचे बांधकाम ३ लक्ष रुपये. तसेच ६) पाच लक्ष रुपयाची निधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर जवळ नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनात वापरण्यात आले. असा एकूण ४१ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार चंद्रीकापूरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी अर्जुनी मोर. विधान सभा छेत्राचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे, जिल्हा परिषद सदस्य भूमेस्वर पटले, पंचायत समिती सदस्य चेतन भाऊ वडगाये, डोंगरगाव ग्राम पंचायतीचे सरपंच आणि तालुका ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष दिनेश हुकरे, उप सरपंच तुकाराम राणे, कुंडलिक लांजेवार तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम सेवक रवींद्र बोरकर, कविता कोरे सदस्य, खेमेस्वरी कोरे सदस्य, सावजी हुकरे, बालाजी खोटेले, भरत कोरे, गणपत कोरे, सह गावातील नागरिक आणि युवक वर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भासणा दरम्यान गावाचा विकास करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.