त्या अपघातात 4 लोकांचा जागीच मृत्यू तर 2 जखमी


  • भारतातील सर्वात सेफ मानली जाणारी टाटा कंपनीची नेक्षान  Global NCAP Crash Test Rating 5 satar हिच्या अपघातात 4 लोकांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. 

सडक अर्जुनी, गोंदिया, दि. 28 जुलै 2022 : दि. 27 जुलै च्या रात्री 11 वाजता तालुक्यातील ग्राम खोबा आणि ग्राम परसोडी नजीक असलेल्या जंगल परिसरातील महामार्गाच्या दोन्ही पुलाच्या मधोमध असलेल्या टर्निंग पॉईंट वर भर धाव वेगाने टाटा कंपनीची नेक्षान गाडी एका येनाच्या झाडाला धडकली दरम्यान अपघातात 2 लोक जखमी झाले आणि 4 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले.

काही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार नवेगाव बांध येथे सोलर पंप फिट करून आपल्या घरी नवेगांव/भजियापार तालुका आमगाव येथे जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले. अपघात इतका भीषण होता की 5 स्टार रेटिंग असलेली टाटा कंपनीची नेक्षान गाडीचा संपूर्ण एका बाजूने चेंदा मेंदा झाला. त्या मुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला, गाडीचे दोन्ही एअर बॅग फाटलेल्या एस्थेत होते. गाडी जवळपास 120 च्या स्पीड मध्ये असेल असा तर्क वितर्क लावला जात आहे.

कोकणा गोसावी येथील पोलीस पाटील काशिनाथ कापगते यांच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपराध क्रमांक : 181/2022 कलम : 279, 337, 338, 304, (अ) भादवी सहकलम 184 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वाहन क्रमांक : एम.एच. 35 एजी 8771 असे आहे.

1) वाहन चालक : वरून निलेश तुरकर 27 वर्षे, मृतक , भजेपार, असे असून याला आरोपी बनविण्यात आले आहे. तर 2) रामकृष्ण योगराज बिसेन 24 वर्ष, मृतक, नवेगाव, 3) सचिन गोरेलाल कटरे 23 वर्ष, मृतक, नवेगाव, 4) संदिप जागेश्वर सोनवाने 18 वर्ष नवेगाव, मृतक, 5) मधुसूदन नंदलाल बीसेन 23 वर्ष, नवेगाव, जखमी, 6) प्रदीप कमलेस्वर बिसेन 24 वर्षे नवेगाव, जखमी, असे आहे. डूग्गीपार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून घटनेचा तपास करीत आहेत. जखमीना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर माहामार्ग पोलिसांनी घटना स्थळी भेट दिली. टाटा कंपनीची नेक्षान ही भारतातील सर्वात मजबूत आणि सेफ गाडी मानली जाते ही गाडी Top 10 Safest Cars in India with Global NCAP Crash Test Rating: मध्ये 5 स्टार रेटिंग मध्ये येते येवढ्या मजबूत गाडीचा संपूर्ण चुराडा झाला असून तब्बल 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झाले आहेत. सांगायचं म्हणजे वेळ आल्यावर कितीही सेफ गाडी असेल तरी मृत्यू अटळ आहे. त्या मुळे वाहन सावकाश चालवावे दरम्यान सांगण्यात येते.


 

Leave a Comment