ग्रामपंचायत डव्वा येथे ‘हरघर तिरंगा’ विशेष ग्रामसभेचे आयोजन.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिं. 28 जुलै 2022 : ग्रामपंचायत डव्वा येथे ‘हरघर तिरंगा’ व ‘हरघर जलसे नल’ ह्या विषयावर पुष्पमाला बडोले सरपंच यांचे अध्यक्षते खाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत गणेश मुनिश्वर ग्रामविकास अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत वर्षा निमित्त हरघर तीरंगा अभियान राबवून गावातील नागरिकांनी स्वेछेने आपापल्या घरी तिंरगा सन्मानाने फडकवीन्यास व ध्वज संहिते बाबत विस्तृत माहिती दिली.

तसेच गावात जलजीवन मिशन अंतर्गत ”हरघर जल से नल” बाबत माहिती दिली. अमृत वर्षात 30 सप्टेंबर पर्यंत मोफत लसिकरण मोहिम राबविन्यात येत असून 18 वर्ष वरील दोन डोज पुर्ण झालेले लोकांनी बूस्टर डोज घेण्यास आवाहन करण्यात आले.

सभेत विषयसुची नुसार चर्चा करण्यात आली. उपस्थित ग्रामसभेच्या सदस्यांनी मांडलेल्या शंका वर चर्चा करण्यात येऊन सर्व शंकाचे समाधान करण्यात आले. शेवटी जलशपथ घेऊन पाण्याचे महत्व पटवून घेतले. डव्वा येथील नागरिकांनी चर्चेत सक्रिय सहभाग देऊन ग्रामसभा शांततेत पार पाडली.

सभेला सर्व ग्राप पदाधिकारी,पोलिस पाटिल, उमेद अंतर्गत ग्रामसंघ व आंगनवाडी सेविका, बचत गट व गावकरी बंधु व भगिनी उपस्तित होते सर्व उपस्थितांचे आभार पुष्पमाला बडोले सरपंच ग्रामपंचायत डव्वा यांनी मानले.


 

Leave a Comment