१३ तलवारी बाळगणारे आरोपी अटक, पोलिश अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती.


  • पोलिश अधीक्षकांनी पत्रकारांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली नाही.
  • वाहन जाळपोळ कनेक्शन तर नाही ना ?
  • १३ तलवारी सह १३ वर्षाचा बालक आणि अन्य १ आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

 गोंदिया, दिनांक – ०७ जुलै २०२२ – पोलीस अधीक्षक विश्व पानसरे गोंदिया यांनी दिनांक : ०६ जुलै रोजी पोलिश अधीक्षक कार्यालय येथील कॉन्फ्रेंश हाल मध्ये पत्रकार परिषद घेऊन पो.स्टे. दवनीवाडा अंतर्गत मौजा निलागोंदी येथुन अवैध  १३ तलवारी बाळगणारे आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती दिली.

आरोपी  नामे खेमलाल बुधुलाल मस्करे रा. निलागोंदी याचे राहते घरी अवैध शस्त्रांबाबत पंचासह रेड केली. असता त्याचे घरी माज घरात एका खाकी रंगाचे खोक्यात एकुण १३ नग लोखंडी तलवार मिळून आले. सदर तलवारीबाबत इसम नामे खेमलाल बुधुलाल मस्करे यास विचारपुस केली असता सदर तलवारी त्याचा भाचा याचे असल्याचे सांगितले. खेमलाल बुधुलाल मस्करे याचे भाचा यास विचारपुस केली. असता त्याने सदर तलवारी त्यानेच घेऊन आल्याचे सांगितले.

खेमलाल बुधुलाल मस्करे वय ५१ वर्ष रा. निलागोंदी व त्याचा विधीसंघषित बालक असलेला भाचा वय वर्ष अंदाजे १३  यांचेकडे शस्त्रे बाळगणेबाबत कोणताही परवाना नसतांना अवैध १३ तलवारी त्याचे ताब्यात अवैधरित्या विक्रीकरीता मिळून आल्याने सदर इसमांविरुध्द पो.स्टे. दवनीवाडा येथे गु.र. क्र. ९९८ / २०२२ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नामे खेमलाल बुधुलाल मस्करे वय ५१ वर्ष रा. निलागोंदी यास अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोउपनि सुखदेव राऊत, पो.स्टे. दवनीवाडा हे करीत आहेत.

सांगायचं म्हणजे दवनीवाडा पोलिश स्टेशन च्या हद्दीत काही दिवसा पूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ने एका शेतकऱ्यांच्या वाहनाला धडक दिली होती. दरम्यान अपघातात ५ शेतकरी मजुरांचा अपघात झाला होता. यामध्ये २ मजुरांचा मृतू झाला होता. मृतू शेतकऱ्यांच्या परिवाराला तत्काळ नुक्शान भरपाई मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केला होता. दरम्यान पोलिश आणि स्थानिकात झडप झाली होती. बातम्यांच्या आधारावर मिळालेल्या माहिती नुसार तीन पोलिश जखमी झाले होते. तर गावकर्यांनी घटना दिनी अपघाती वाहनाला आग लावली होती. दोन घटने मध्ये १७ ते १८ नागरिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

उपस्थित पत्रकारांनी पोलिश अधीक्षकांना सदर घटनेचा आणि मिळालेल्या तलवारींचा काही संबंध तर नाही ना यावर विचारणा केली. आणि अपघाती वाहनामध्ये अश्लेली वाळू ही अवैध आहे की वेध आहे, वाहन धारकावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. असे अनेक प्रशन विचारले मात्र पोलिश अधीक्षकांनी पत्रकारांच्या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली नाही. नियमित पत्रकार परिषद घ्यावी असा सल्ला पत्रकारांनी दिला.


 

Leave a Comment